वर्क फ्रॉमच्या नावाने महिलांना ई-हनीट्रॅममध्ये ओढणाऱ्या आंतरराष्ट्रीय तस्कर टोळी समोर आली आहे. भारत सरकारने म्यानमारमधून सोडवलेल्या सायबर गुलामगिरी कॉल सेंटरमध्ये अडकलेल्या 549 भारतीयांपैकी एक गोव्यातील आहे. गोवा पोलिसांच्या तपासात असं दिसून आलं आहे की आरोपी थायलंड आणि कंबोडियामध्ये सक्रिय असलेल्या चिनी नागरिकांसाठी काम करतात. या टोळीचा भारतात कॉल सेंटर स्थापन करण्याचा हेतू होता, असं गोवा पोलिसांनी सांगितले.
advertisement
पीएसआय सर्वेश सावंत यांनी दाखल केलेल्या राज्य तक्रारीवरून आरोपींनी पीडितेला थायलंडमध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करत तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेला कॉल सेंटर कर्मचारी म्हणून काम करण्यासाठी मासिक 60000 रुपये पगाराची ऑफर देण्यात आली होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितलं की, 'वर्क फ्रॉम होमच्या आमिषाने सायबर हनीट्रॅप फसवणुकीसाठी महिलांची भरती करण्यात आली. आरोपींनी भारत आणि नेपाळमध्ये कॉल सेंटर स्थापन करण्याची योजना आखली होती. या प्रकरणात सहभागी असलेला एक कझाकस्तानी नागरिक बंगळुरूमध्ये राहत होता.'
डीजीपी पुढे म्हणाले, तपासात असं दिसून आलं आहे की मुंबईत एक एजन्सी आहे जी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे नोंदणीकृत नाही आणि बेकायदेशीर कारवायांमध्ये गुंतलेली आहे. ही एजन्सी लोकांना परदेशात उच्च पगाराच्या नोकऱ्या देण्याचं आश्वासन देत असे आणि नंतर त्यांना थायलंड, कंबोडिया सीमेवर सोडते. पीडितांचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आणि त्यांना सायबर फसवणुकीच्या संदर्भात काम करण्यास भाग पाडलं गेलं.
सायबर क्राईम एसपी राहुल गुप्ता म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणात तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील 22 वर्षीय आदित्य रविचंद्रन, मुंबईतील मुलुंड येथील 36 वर्षीय रूपनारायण गुप्ता आणि चिनी वंशाची कझाकस्तानी नागरिक 22 वर्षीय तलानीती नुलाक्सी यांना अटक केली आहे. तपासादरम्यान आम्हाला कळलं की आरोपी थायलंड आणि कंबोडियामध्ये सक्रिय असलेल्या चिनी नागरिकांच्या वतीने काम करतात.
बायको जवळ घ्यायची नाही, सासूवर होता डोळा, 37 वर्षीय नवऱ्यासोबत भयंकर कांड
गुप्ता म्हणाले, रवीचंद्रन थायलंडमधील कथित पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात सहभागी होता. त्याला उमेदवारांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येत होती. रवीचंद्रन दुसऱ्या आरोपी रुपनारायण गुप्ता यांच्यासाठी काम करत होता, जो मुंबईत परदेशात नोकरीसाठी भरती करणारी एजन्सी इवांका चालवतो.
देशातील त्याच्या एजंटांकडून उमेदवारांचा डेटा मिळतो, जो मुलाखती घेण्यासाठी वापरला जातो. त्याने पीडितांसाठी तिकिटं बुक करून त्यांना थायलंडला पाठवलं तिसरा आरोपी नुलाक्सी, व्हॉट्सअॅप, टेलिग्राम, वीचॅट आणि झूम सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्यास भाग पाडण्यासाठी पीडितांना कामावर ठेवण्यातही सहभागी होता.”
या टोळीने झूमवर मीटिंग आणि मुलाखती घेतल्या. या टोळीची आंतरराष्ट्रीय उपस्थिती असल्याचं आढळून आलं. इतर देशांमधील एजंट आरोपींच्या संपर्कात होते. ही टोळी अनेक भारतीयांना चांगल्या पगाराच्या परदेशी नोकऱ्या देऊन परदेशात पाठवण्यात गुंतलेली होती. गोव्यातील आणखी काही लोकांना भरती करण्यात आलं आहे का हे निश्चित करण्यासाठी आरोपीची चौकशी केली जात आहे.