TRENDING:

Ind Vs Pak: 29,000 किमी स्पीड अंतराळामध्ये ISRO ने दाखवली ताकद, पाकिस्तान गेला कोमात!

Last Updated:

भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो ISRO ने अंतराळमध्ये असा पराक्रम केला होता, त्याचा पाकिस्तान स्वप्नामध्ये कधी विचार सुद्धा करू शकणार नाही. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई:  जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचं संबंध ताणले गेले. भारतात आता युद्ध जन्य परिस्थितीत सतर्क राहण्यासाठी मॉक ड्रील घेतलं जात आहे. पण भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो ISRO ने अंतराळमध्ये असा पराक्रम केला होता, त्याचा पाकिस्तान स्वप्नामध्ये कधी विचार सुद्धा करू शकणार नाही.
News18
News18
advertisement

अमेरिकेनं चीनवर अंतराळात 'डॉगफाइट'चा आरोप केला तेव्हा जगाला धक्का बसला होता. पण आता भारतानेही असाच एक पराक्रम केला आहे. SPADEX मोहिमेअंतर्गत इस्रोने जे काही केलं त्याचा पाकिस्तान कधीच विचारही करणार नाही. दोन भारतीय उपग्रहांना अंतराळात २९,००० किमी/तास वेगानं समोरासमोर फिरवण्यास भाग पाडलं. SPADEX म्हणजेच स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट मिशनचा (Space Docking Experiment) उद्देश उपग्रहांमधील स्वयंचलित डॉकिंग-अनडॉकिंगच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे हा होता. हे मिशन आधीच यशस्वी झालं होतं. पण जेव्हा इस्रोला आढळलं की दोन्ही उपग्रह - SDX 01 आणि SDX 02 - मध्ये अजूनही सुमारे 50% इंधन शिल्लक आहे, तेव्हा शास्त्रज्ञांनी ते दुसऱ्या कठीण चाचणीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला.

advertisement

पुढे जे घडले ते अद्भूत असंच होतं. दोन्ही उपग्रहांना अत्यंत अचूक गणना आणि नियंत्रणाने एकमेकांच्या जवळ आणण्यात आले, त्यांचा वेग आणि दिशा अशा प्रकारे बदलण्यात आली जणू काही हवाई दलाची लढाऊ विमाने आकाशात समोरासमोर टक्कर देण्याचा सराव करत आहेत. हे उपग्रह २८,८०० किमी/तास वेगाने उड्डाण करत होते, जे कोणत्याही सामान्य विमानापेक्षा २८ पट जास्त आहे.

advertisement

इस्रोने या संपूर्ण सरावाचे वर्णन 'तांत्रिकदृष्ट्या खूप गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक' असं केलं आहे. यावरून इस्रोच्या क्षमतेचा तो पैलू दिसून येतो जो केवळ रॉकेट लाँच करण्यापलीकडे जातो. हे खऱ्या 'अंतराळ युद्धाच्या' तयारीचे लक्षण आहे.

अमेरिकेचं वाढलं टेन्शन 

मार्च २०२५ मध्ये अमेरिकेनं चीनवर त्यांच्या उपग्रहांद्वारे अवकाशात डॉगफाइट्सचा सराव केल्याचा आरोप केला. अमेरिकेने याला संभाव्य लष्करी धोका म्हणून पाहिलं. आता भारतानेही असाच एक सराव केला आहे, पण तो अतिशय शांत आणि वैज्ञानिक पद्धतीने. भारताच्या वाढत्या अवकाश संरक्षण आणि कक्षीय वर्चस्वाची ही एक झलक आहे.

advertisement

पाकिस्तान कुठे उभा आहे?

भारत अंतराळात अशा प्रगत तंत्रज्ञानाची चाचणी घेत असताना, पाकिस्तान अजूनही जीपीएससाठी चीन आणि अमेरिकेवर अवलंबून आहे. त्यात ना ऑर्बिटल तंत्रज्ञान आहे ना SPADEX सारख्या प्रकल्पांशी जुळणारा कार्यक्रम. भारताचे हे पाऊल केवळ एक वैज्ञानिक कामगिरी नाही तर एक धोरणात्मक संदेश देखील आहे की आपण केवळ पृथ्वीवरच नाही तर अंतराळातही तयार आहोत.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Ind Vs Pak: 29,000 किमी स्पीड अंतराळामध्ये ISRO ने दाखवली ताकद, पाकिस्तान गेला कोमात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल