TRENDING:

Jugaad Video : कांद्यात घुसवला खिळा; मोठ्या समस्येतून सुटका

Last Updated:

कांद्यात खिळा... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. या जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : आपण डाळ, भाजीमध्ये कांद्याचा वापर करतो. फक्त  कांद्याचीही भाजी करतात. पावसाळ्यात तर तुम्ही गरमागरम कांदा भजीवर ताव मारलाच असेल. असा हा कांदा. पण या कांद्यात तुम्ही कधी खिळा घुसवून पाहिला आहे का? या जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
फोटो : व्हायरल व्हिडीओ ग्रॅब
फोटो : व्हायरल व्हिडीओ ग्रॅब
advertisement

कांद्यात खिळा... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. तिनं व्हिडीओ दाखवल्यानुसार पूर्ण कांदा घ्यायचा आहे. त्याच्या दोन बाजूंमध्ये समोरासमोर असा खिळा घुसवायचा आहे. हा खिळा तुम्हाला कांद्यात तसाच ठेवायचा नाही तर कांद्यातून आरपार झाल्यानंतर तो कांद्यातून बाहेर काढायचा आहे. यामुळे कांद्याला होल पडतील.

साबण वापरण्याआधी त्यावर खिळा जरूर मारा; का ते पाहा Jugaad Video

advertisement

आता सुईदोरा घ्या. कांद्याला पाडलेल्या छिद्रांतून सुईने दोरा टाकून तो दोरा बांधून घ्या. कांदा लटकवता येईल इतका दोरा असावा. हा कांदा भिंतीला एक खिळा ठोकून तिथं लटकवा. शक्यतो किचनमध्ये तुम्ही हा लटकवू शकता.

इथं पाहा व्हिडीओ

Pal pal real vlog युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

advertisement

याचा फायदा काय?

आता याचा फायदा काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर हा कांदा लटकवल्याने घरात असलेल्या पालींच्या समस्येपासून सुटका मिळते. हा कांदा 2 महिने खराब होत नाही, असा दावा महिलेने व्हिडीओत केला आहे.

पालींना दूर ठेवण्याचे आणखी काही उपाय

अंड्याचं कवच

अंड्याच्या कवचामधून येणाऱ्या वासामुळे पाली पळून जातात. त्यामुळे अंड्याचं कवच घराच्या कोपऱ्यांमध्ये किंवा घराच्या वरच्या माळ्यांमध्ये ठेवून द्या.

advertisement

पेपर स्प्रे

तुम्ही बाजारातून पेपर स्प्रे म्हणजेच मिरपूड स्प्रे विकत घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः घरी तयार करू शकता. हा स्प्रे बनवण्यासाठी काळी मिरी बारीक वाटून घ्या. त्यात पाणी मिक्स करा आणि ते बाटलीत भरा आणि भिंतींवर शिंपडा. जिथे जिथे पाल दिसेल तिथे स्प्रे मारल्याने पाली पळून जातील आणि पुन्हा दिसणार नाहीत.

advertisement

Jugaad Video : घरात ठेवा फक्त बाटल्यांची झाकणं, उंदीर स्वतःच घराबाहेर पळतील

थंड पाणी

पालींना उबदार जागा आवडतात. अशा परिस्थितीत पाली दिसताच त्यांच्यावर थंड पाणी शिंपडा. या शिवाय, खोलीतील एसी वाढवा, जेणेकरून खोली थंड होईल आणि पाली पळून जातील.

गवती चहा

पाली दूर करण्यासाठी गवती चहादेखील प्रभावी आहे. म्हणूनच पाली असतील तिथे ठिकाणांभोवती गवती चहा ठेवा.

काय काळजी घ्याल?

- घराच्या खिडक्यांना जाळी लावा जेणेकरून पाली घरात येणार नाहीत.

- पाली घरातील अन्नपदार्थ शोधतात, म्हणून बाहेर पडलेलं निरुपयोगी आणि उष्टं अन्न फेकून द्या आणि उष्टी भांडी जास्त वेळ सिंकमध्ये राहू देऊ नका.

मराठी बातम्या/Viral/
Jugaad Video : कांद्यात घुसवला खिळा; मोठ्या समस्येतून सुटका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल