TRENDING:

Kitchen Jugaad Video : दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, मोठा फायदा

Last Updated:

Use Flower jugaad : वापरलेल्या फुलांचा काय उपयोग असणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही याचा फक्त एक नाही तर अनेक फायदे आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : दसरा म्हटलं की झेंडूची फुलं, आंब्याची पानं आली. दारोदारी झेंडु आणि आंब्याच्या पानांचं तोरण झालं. दसरा संपला की हे एक तर आपण निर्माल्यात टाकतो किंवा कचऱ्यात फेकून देतो. तुम्हीही तेच करता का? दसऱ्यासाठी असो वा कधीही पूजेसाठी वापरलेली असो ही फुलं किंवा पाने बिलकुल फेकू नका. त्याचा मोठा फायदा आहे. या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

वापरलेल्या फुलांचा काय उपयोग असणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही याचा फक्त एक नाही तर अनेक फायदे आहेत. एका महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याचे सगळे फायदे सांगितले आहेत. याचा वापर कसा करायचा ते सांगितलं आहे.

पहिला उपयोग : एक भांडं घ्या त्यात पाणी घ्या. त्यात फुलं कुस्करून टाका. यात कापूर टाका. गॅसवर ठेवून उकळून घ्या. या पाण्याचा सुगंध येईल. हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. याचा सुगंध येतं, रूम फ्रेशनरचं काम होतं. डास, माशांना दूर करतं. एकदा ठेवला तर 15-20 दिवस वापरू शकतो.

advertisement

तेल न वापरता वडे, तेलाची बचत आणि हेल्दीही, बनवायचे कसे पाहा Kitchen Jugaad Video

दुसरा उपयोग : कढई किंवा पॅन घ्या. त्यात फुलं कुस्करून घ्या. यात फुलं जास्तच घ्या कारण नंतर ती कमी होतात. गॅसवर ठेवून परतून घ्या. या पाकळ्या तुम्हाला गरम करून वाळवून घ्या. ती कुरकुरीत होती आता हातांनी कुस्करून किंवा मिक्सरमध्ये टाकून पावडर करून घ्या. ती चाळून घ्या. चाळून घेतलेल्या फुलांच्या पावडरमध्ये कापराची पूड टाका. यात तूप किंवा तेल टाका आणि मिश्रण मिक्स करून घ्या. तयार असलेली ओली धूपकांडी घ्या म्हणजे ती बांधायला चांगली मिळते. होमहवनची सामग्री असल्यास तेसुद्धा यात टाकू शकता. अगरबत्तीही तोडून टाकू शकता. ही तुमची धूपस्टीक तयार झाली.

advertisement

तिसरा उपयोग : एक मातीचं भांडं किंवा खराब प्लेट घ्या. त्यात वाळलेली फुलं, आंब्यांची वाळलेली पानं, कांदा-लसणीच्या साली टाका. यात एक कापूर ठेवा आणि तो पेटवा. यामुळे घरात सुगंध पसरतो, मच्छर, माशा, चिलट, झुरळं पळून जाता. घरातील दमट वास जातो.

Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये मीठ ठेवताच चमत्कार, हजारो रुपये वाचतील

advertisement

चौथा उपयोग : वाळलेली फुलं ज्याचा खालचा भाग काळा झाला असेल त्या बाजूने पाकळ्या मातीत रोवायच्या. यामुळे नवीन झाड येईल.

पाचवा उपयोग : आता एका भांड्यात फुलांच्या पाकळ्या टाका, त्यात पाकळ्या भिजतील इतकं पाणी टाका हे उकळून घ्या. पाण्यात फुलांचा उतरेल. या पाण्यात रांगोळी मिक्स करा. हे मिश्रण ताटात पसरवून उन्हात चांगलं वाळवून घ्या. नैसर्गिक रांगोळी तयार.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : दसऱ्याला वापरलेली झेंडूची फुलं फेकू नका; कढईत टाका, मोठा फायदा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल