TRENDING:

Kitchen Jugaad Video : डिटर्जंट पावडर, साबणाशिवाय धुवा कपडे, तेही फक्त एका औषधाच्या गोळीने

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : औषधाच्या गोळीने कपडे धुण्याचा जबरदस्त जुगाड एका महिलेने दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : कपडे धुवायचे म्हटलं की त्याच्यासाठी डिटर्जंट पावडर आणि साबण आलाच. पण डिटर्जंट पावडर आणि साबणाशिवायही कपडे धुता येतात, असं तुम्हाला सांगितलं तर... तेही औषधाच्या गोळीने... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण औषधाच्या गोळीने असे कपडे धुण्याची ट्रिक तुम्ही आजवर कधीच पाहिली नसेल.
News18
News18
advertisement

औषधाच्या गोळीने कपडे धुण्याचा जबरदस्त जुगाड एका महिलेने दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आता औषधाच्या गोळीने कपडे धुवायचे म्हणजे नेमके कसे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल आणि ते जाणून घेण्याची उत्सुकता असेल. महिलेने नेमकं हे कसं केलं आहे ते जाणून घेऊयात.

Kitchen Jugaad Video : 1 रुपयात संपूर्ण किचन चकाचक, हा जुगाड एकदा पाहाच

advertisement

महिलेने व्हिडीओत दाखवल्यानुसार कपड्यांना जिथं डाग आहेत तिथं बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा टाका एक्स्पायर औषधाची गोळी घ्या. पांढरी टॅबलेटच घ्या. कलरफुल मेडिसीन नाही. टॅबलेटची पावडर करून कपड्याच्या डागावर जिथं बेकिंग सोडा टाकला तिथं ही पावडर टाका. आता बेकिंग सोडा आणि टॅबलेटच्या पावडरवर लिंबूचा रस टाका. लिंबू फ्रेश हवाच असं नाही तुम्ही खराब झालेल्या लिंबूचा रसही वापरू शकता. आता यावर थोडं पाणी टाकून तिथल्या तिथं नीट घासून घ्या.

advertisement

आता कमीत कमी 10-15 मिनिटं ठेवून द्या. आता यावर पाणी टाकून घासून घ्या. नंतर लिंबूचा रस आपण वापरला त्याची साल यावर घासा. आता पाण्यात धुवून पाहा. तुम्ही व्हिडीओत पाहाल तर शर्टच्या कॉलवरील डाग अगदी सहजपणे गेला आहे.

ज्या पाण्यात या शर्टची कॉलर धुतली ते पाणी अस्वच्छ झालेलं दिसेल. म्हणजे त्या शर्टच्या कॉलरवरील सगळी मळ त्या पाण्यात आली. पुन्हा हे शर्ट नीट स्वच्छ पाण्यात धुवून घ्या आणि हवं तर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात पुन्हा धुवून पाहा. ते पाणी आधीसारखं खराब झालं नाही, तर स्वच्छ राहिलं आहे. याचा अर्थ शर्टच्या कॉलरवरील डाग निघाले आहेत.

advertisement

Kitchen Jugaad Video : प्लॅस्टिक पिशवीने कपडे धुण्याची पद्धत, धोबीलाही माहिती नाही हे सीक्रेट

@crazy_995az युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा जुगाड करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : डिटर्जंट पावडर, साबणाशिवाय धुवा कपडे, तेही फक्त एका औषधाच्या गोळीने
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल