TRENDING:

Kitchen Jugaad Video : कुकरमध्ये धुवा भांडी, काही मिनिटात चकाचक होतील

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : आतापर्यंत कुकरमध्ये तुम्ही भात, डाळ, भाजी आणि बरेच पदार्थ बनवले असतील पण कुकरमध्ये कधी भांडी घासून पाहिली आहेत का? एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : घरातील सर्वात कंटाळवाणं काम कोणतं, असं विचारलं तर अनेक जण म्हणतील भांडी घासणं. तसं आता कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन बहुतेकांच्या घरात आहे. भांडी घासण्यासाठी डिशवॉशरही आहे पण ते सर्वांकडेच आहे असं नाही. काही जणांकडे भांडी घासण्यासाठी मोलकरीण आहे. पण तरी कधी एखादी अशी वेळ येते की स्वतःलाच भांडी घासावी लागतात. पण आता भांडी घासण्याचं टेन्शन सोडा. कारण आता भांडी घासण्याचं काम तुमचा कुकर करेल. हा जबरदस्त असा किचन जुगाड आहे.
News18
News18
advertisement

आतापर्यंत कुकरमध्ये तुम्ही भात, डाळ, भाजी आणि बरेच पदार्थ बनवले असतील पण कुकरमध्ये कधी भांडी घासून पाहिली आहेत का? एका गृहिणीने हा जबरदस्त किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींकडे असे कित्येक घरगुती जुगाड असतात. काही गृहिणी या किचन टिप्स सोशल मीडियावर शेअर करतात. असाच हा व्हिडीओ आहे. ज्यात एका महिलेने कुकरमध्ये भांडी घासून दाखवली आहेत.

advertisement

Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये तेल-मिठाची कमाल, म्हणतात कमी होईल लाइट बिल

सामान्यपणे कोणतंही भांडं आपण वापरलं ते खराब झालं की किचन सिंकमध्ये धुण्यासाठी टाकतो. किचन सिंकमध्ये आपण भांडी घासतो. पण आता यापुढे भांडी किचन सिंकमध्ये नव्हे तर कुकरमध्ये टाका. तुमच्याकडे अशी काही भांडी असतील जी गॅसवर ठेवल्यानंतर काळी पडली असतील. हातांनी कितीही घासलं तरी या भांड्यांवरील काळे डाग सहजासहजी जात नाही. अशा भांड्यांसाठी ही ट्रिक तुमच्या कामी येईल.

advertisement

तुम्हाला करायचं काय आहे तर एक कुकर घ्यायचा आहे, त्यात तुम्हाला थोडं पाणी टाकायचं आहे. यात मीठ, व्हिनेगर, डिटर्जंट टाका. ते ढवळून घ्या. त्यात जी भांडी तुम्हाला घासायची आहेत, ती टाका. कुकरचं झाकण बंद करून घ्या आणि कुकरखालील गॅस चालू करा. कुकरची एक शिट्टी होऊ द्या. एका शिट्टीनंतर कुकर थंड करून घ्या आणि त्यातील भांडी काढा. तुम्ही पाहाल तर कुकरमधील भांडी अगदी चकाचक झाली आहेत.

advertisement

महिलेने व्हिडीओत सांगितल्यानुसार तुम्हाला ही भांडी पुन्हा साबण लावून घासण्याची गरजच नाही. साध्या पाण्याने तुम्ही धुवून घ्या. या भांड्यासोबतच कुकरही अगदी स्वच्छ झालेला दिसेल. कुकरमध्ये काहीही शिजवलं की त्यावर काळे-पिवळे डाग येतात आणि तेसुद्धा सहज निघत नाही. पण या पद्धतीने भांडी घासली तर इतर भांड्यांसोबत कुकरही स्वच्छ होतो.

advertisement

Kitchen Jugaad Video : तेल-तुपाऐवजी चपातीवर टॉयलेट क्लिनर लावून पाहा

Avika Rawat Foods युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही अशा पद्धतीने भांडी घासून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याशिवाय तुम्ही भांडी घासण्यासाठी असा काही विचित्र जुगाड वापरता का? तर तेसुद्धा शेअर करा.

(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज 18 मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : कुकरमध्ये धुवा भांडी, काही मिनिटात चकाचक होतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल