न्यूजपेपरचा काही लोक आणखी काही कारणांसाठी वापर करतात. पण फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवण्याचा असा वापर कुणीच केला नसेल किंवा कुणाला माहितीही नसेल. फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवल्याने खूप मोठा फायदा होता. न्यूजपेपरच्या या साध्यासोप्या उपायाने तुमची खूप मोठी समस्या यामुळे दूर होईल. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल ही तर कमालच झाली. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, यात बरेच वेगवेगळ्या घरगुती टीप्स देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवण्याची.
advertisement
चपातीच्या पिठात साबण नक्की टाका; काय कमाल होते पाहा VIDEO
ही महिला न्यूजपेपरचं एक पान घेते. त्याचा गोळा करते. तो ती पाण्यात भिजवून घेते. हा भिजवलेला न्यूजपेपरच्या पानाचा गोळा ती दुसऱ्या एका वाटीत ठेवते आणि ती वाटी फ्रीजमध्ये ठेवते. महिलेने सांगितल्यानुसार या उपायामुळे फ्रीजमध्ये वास जातो. तुम्हाला माहिती असेल फ्रीजमध्ये काही पदार्थ ठेवल्याने त्या पदार्थांचा वास फ्रीजमध्ये येतो. फ्रीजमधील हा वास घालवण्यासाठी लोक काय काय नाही करत. प्रत्येक जण आपापल्या परीने उपाय करतात. पण हा उपाय अगदी साधासोपा आहे. यात फार काही लागत नाही आणि फार मेहनत घेण्याचीही गरज नाही.
नेल कटरमध्ये येणाऱ्या दोन लहान सुऱ्यांचा उपयोग काय, तुम्हाला माहितीय?
पिंक्स इनोव्हेशन या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हा उपाय प्रभावी ठरेलच याची शाश्वती न्यूज 18 मराठी देत नाही. पण तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम काय येतो, तो आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.