फ्रिजमध्ये तेल आणि मिठाचा हा जबरदस्त असा किचन जुगाड. या जुगाडाचा व्हिडीओ एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फ्रिजमध्ये तेल-मीठ ठेवल्याने लाईट बिल कमी होईल, असा दावा या गृहिणीने केला आहे. आता हे कसं शक्य आहे, हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल.
Kitchen Jugaad Video : तेल-तुपाऐवजी चपातीवर टॉयलेट क्लिनर लावून पाहा
advertisement
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. महिला सुरुवातीला एका वाटीच्या तळाला तेल लावून ती वाटी फ्रिजरमध्ये ठेवते. याचा फायदा काय, तर बऱ्याचदा फ्रिजरमध्ये बर्फ जमतो आणि तिथं असलेली भांडी या बर्फात चिकटून राहतात. जी सहजासहजी निघत नाहीत. बर्फ वितळेपर्यंत थांबावं लागतं. पण फ्रिजरमध्ये भांडं ठेवताना त्याच्या तळाशी असं कोणतंही तेल लावलं तर ते भांडं फ्रिजरला चिकटणार नाही. हवं तेव्हा ते सहज काढता येईल.
दुसरं म्हणजे मिठाचा वापर. महिलेने गाळणीत मीठ घेऊन ते फ्रिजरमध्ये चाळलं आहे. फ्रिजरमध्ये अशा पद्धतीने मीठ चाळून ठेवल्याने जो अतिरिक्त बर्फ तयार होतो तो होणार नाही. या बर्फामुळे लाइट बिल वाढतं, जे कमी होईल असा दावा या महिलेने केला आहे.
Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये तेल टाकताच जणू जादूच झाली, आश्चर्यकारक परिणाम
तेल-मिठाचा फ्रिजमधील या जुगाडाचा व्हिडीओ ab vlog युट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. (फोटो - युट्युब व्हिडीओ ग्रॅब)