TRENDING:

Kitchen Jugaad Video : एकदा तरी चप्पल किसणीवर घासा, टळेल मोठा धोका

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : एका गृहिणीने किसणीवर चप्पल घासण्याचा फायदा सांगितला आहे. तुम्हाला वाचून विचित्र वाटेल. पण खरंतर या विचित्र वाटणाऱ्या किचन जुगाडचा इतका मोठा फायदा आहे. की तुम्ही विचारही केला नसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : तुम्ही आजवर किसणीवर खोबरं, आलं, बटाटा किंवा एखादी भाजी किसली असेल. पण कधी किसणीवर चप्पल किसली आहे का? एका गृहिणीने किसणीवर चप्पल घासण्याचा फायदा सांगितला आहे. तुम्हाला वाचून विचित्र वाटेल. पण खरंतर या विचित्र वाटणाऱ्या किचन जुगाडचा इतका मोठा फायदा आहे. की तुम्ही विचारही केला नसेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने केलेला हा जुगाड. ज्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावरही पोस्ट केला आहे. ही हटके अशी आयडिया तिने सर्वांना दिली आहे. आता किसणीवर चप्पल घासल्याने काय होतं, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल. चला तर मग व्हिडीओ पाहूयात.

Kitchen Jugaad Video : एका ग्लासने संपूर्ण टॉयलेट चकाचक, Toilet Cleaning ची अनोखी पद्धत

advertisement

व्हिडीओत गृहिणीने दाखवल्यानुसार तिने वेगवेगळ्या चप्पल घेतल्या आहेत. चपलांचे तळवे ती हलक्या हातांनी हळूहळू किसणीवर घासत आहे. महिलेने सांगितल्यानुसार जुनी किंवा नवी कोणतीही चप्पल असो एकदा तरी ती अशा पद्धतीने किसणीवर घासा. किसणीवर चप्पल घासल्यानंतर त्याचे तळवे पाहा तर ते थोडे खडबडीत झालेले दिसतील.

आता चप्पल किसणीवर घासण्याचा फायदा काय? तर तुम्ही पाहिलं असेल काही नव्या चपलांचे तळवे सपाट, तुळतुळीत असता. किंवा काही चपलांचे तळवे सुरुवातीला खडबडीत असतात पण त्या वापरून वापरून जुन्या झाल्यावर त्यांचे तळवे घासले जातात आणि ते सपाट होतात. चपलांचे तळवे असे सपाट झाले तर चालताना चप्पल घसरते आणि आपण पडण्याचा धोका असतो. अशा चप्पल घातल्यावर हेच सर्वात मोठं टेन्शन असतं. तुम्ही कधी ना कधी अशा सपाट तळव्यांच्या चपलांमुळे पडला असाल.

advertisement

Kitchen Jugaad Video : ढिगभर कपडे धुवा तेही फक्त हिरव्या मिरचीने

त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करू शकता. किसणीवर चप्पल घासून त्याचे तळवे खडबडीत करून वापरा. यामुळे त्या घसरण्याचा आणि तुम्ही पडण्याचा धोका राहणार नाही.

पुणेरी तडका युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा उपाय तुम्ही करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिताय? शरीराला कसा होतो फायदा? संपूर्ण माहितीचा Video
सर्व पहा

(सूचना - हा लेख सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज 18 मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : एकदा तरी चप्पल किसणीवर घासा, टळेल मोठा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल