TRENDING:

Kitchen Jugaad Video : तेल-तुपाऐवजी चपातीवर टॉयलेट क्लिनर लावून पाहा

Last Updated:

Kitchen Tips in Marathi : चपाती आणि टॉयलेट क्लिनर एकत्र वापरण्याचा मोठा फायदा आहे. गृहिणींनी हा उपाय दाखवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टॉयलेट क्लीनरचा वापर आपण टॉयलेट स्वच्छ करण्यासाठीच करतो. पण तुम्ही कधी चपातीला टॉयलेट क्लीनर लावून पाहिलं आहे का? चपातीला टॉयलेट क्लीनर वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. आतापर्यंत तुम्ही चपातीला तेल-तूप लावलं असेल. आता एकदा टॉयलेट क्लीनर लावून पाहा. चपातीला टॉयलेट क्लीनर लावण्याचा मोठा फायदा आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. चपाती आणि टॉयलेट क्लीनर यांच्या एकत्रित वापरामुळे काय कमाल होते हे काही गृहिणींनी दाखवलं आहे.
News18
News18
advertisement

गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. बऱ्याच गृहिणी हे जुगाड आपल्यापुरता मर्यादित न ठेवता इतरांनाही देतात. सोशल मीडियावर या घरगुती जुगाडाचे व्हिडीओ शेअर करतात. अशाच गृहिणींनी शेअर केलेला हा चपाती-हार्पिक जुगाडाचा व्हिडीओ.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता तव्यावर एक चपाती दिसते आहे. सामान्यपणे आता चपातीला तेल-तूप लावणं अपेक्षित आहे. पण या व्हिडीओत मात्र गृहिणीने या चपातील तेल-तूप लावलं नाही. तर या चपातीला तिने हार्पिक लावलं. हार्पिक तिने या चपातीवर पसरवलं. यानंतर तिने ही चपाती तशीच उचलली आणि एका वाटीत ठेवली. या वाटीत थोडं पाणीही आहे. या पाण्यात तिने हार्पिक लावलेली चपाती भिजवली आणि ती मिक्स केली. चपाती, हार्पिक, पाणी यांचा तिने लगदा केला.

advertisement

Kitchen Jugaad Video : फ्रिजमध्ये तेल टाकताच जणू जादूच झाली, आश्चर्यकारक परिणाम

यानंतर तिने जुन्या टूथब्रशने हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्याच्या तळाशी लावून घासलं. तुम्ही पाहिलं असेल मिक्सर भांडं तळाशी खूप खराब होतं, ते नीट घासताही येत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने हे भांडं स्वच्छ करता येऊ शकतं. व्हिडीओच्या शेवटी तुम्ही त्याचा परिणामही पाहू शकता.

advertisement

आणखी एका गृहिणीनेही हाच जुगाड दाखवला आहे. आणखी एका गृहिणीनेही हाच जुगाड दाखवला आहे. पण तिने अख्ख्या चपातीवर हार्पिक टाकलं नाही. तर तिने एका भांड्यात चपाती घेऊन त्यावर थोडं पाणी टाकून ती भिजत ठेवली. नरम झाल्यानंतर ती चपाती कुस्करली आणि मग त्यात हार्पिक मिक्स करून त्याचा लगदा केला. तिनेही मिक्सरवर हा लगदा टूथब्रशने घासला. थोडा वेळ तिने ते भांडं त्या मिश्रणासह तसंच ठेवलं आणि पुन्हा टूथब्रशने घासून पाण्याने स्वच्छ करून घेतलं.

advertisement

Kitchen Jugaad Video : न्यूजपेपर रद्दीत देण्याऐवजी फ्रिजमध्ये ठेवा; जबरदस्त फायदा

आता तुम्ही म्हणाल की जर मिक्सरचं भांडंच स्वच्छ करायचं तर मग त्यासाठी चपाती का? थेट हार्पिक का नाही?. तर व्हिडीओत गृहिणीने सांगितल्यानुसार तुम्ही थेट हार्पिक लावू शकता पण यामुळे मिस्करच्या भांड्याचं पॉलिश निघून जाईल. पण चपातीसोबत मिक्स करून लावल्याने भांडं स्वच्छ होईल आणि पॉलिशही निघणार नाही. हा उपाय तुम्ही फक्त मिक्सरच्या भांड्यापुरता नाही तर इतर भांड्याच्या मागे लागलेले काळे डाग घालवण्यातही फायदेशीर ठरेल, असं या गृहिणीने सांगितलं.

advertisement

Nisha Kitchen आणि Vardan Pakwan युट्यूब चॅनेलवर हे व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. या उपायाची हमी न्यूज 18 मराठी देत नाही पण तुम्ही तो करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा आला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : तेल-तुपाऐवजी चपातीवर टॉयलेट क्लिनर लावून पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल