एका गृहिणीने कुलूपाचा अजब असा उपाय दाखवला आहे. हे कुलूप तुम्हाला दरवाजाशिवाय तुमच्या हातालाही लावायचं आहे. आता हाताला कुलूप कसं लावणार आणि याचा काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी व्हिडीओ पाहुयात. व्हिडीओत पाहाल तर गृहिणीने हाताला कुलूप लावलं म्हणजे हातावर ते घासलं आहे. तिने हातावर टाळं-चावी घासण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
Kitchen Jugaad Video : वॉशिंग मशीनची गरजच पडणार नाही; एका डब्यात असे धुवा कपडे
आता हे उपाय सर्वांनी करायचा आहे असा नाही. तर एका समस्येसाठी हा उपाय आहे. काही वेळा मधमाशी किंवा तसा किटक चावल्याने त्वचेवर खूप जळजळ होते. अशा जळजळ होत असलेल्या भागावर हे टाळं किंवा चावी घासायची आहे. कुलूप हे लोखंडाचं असतं. ते जळजळ होत असलेल्या भागावर घासल्यास जळजळ कमी होते, असा दावा या महिलेने केला आहे. हा उपाय तात्पुरता आहे. यानंतर उपचारासाठी डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही या महिलेने दिला आहे.
Kitchen Jugaad Video - टूथपेस्टमध्ये टॉयलेट क्लिनर मिक्स करून वापरा; आहे जबरदस्त फायदा
SEEMA FAMILY VLOG युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज 18 मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)
