घड्याळ आपण वेळ पाहण्यासाठी वापरतो. म्हणजे घड्याळ सुरू असताना त्याचा हा एकच वापर असतो. पण जेव्हा घड्याळ बंद होतं तेव्हा उलट त्याचे खूप वापर आहेत. असे की तुम्ही विचारही केला नसेल. बंद निरुपयोगी घड्याळ इतकं उपयोगी ठरू शकतं, हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे वापर एकेएक करून पाहूया.
advertisement
तुमच्याकडे इस्त्री असेल तर तुम्ही पाहिलं असेल त्याची वायर नीट गुंडाळून ठेवावी लागते. पण ती केबल एकत्र राहिल असं काही इस्त्रीला नसतं. यासाठी तुम्ही घड्याळ वापरू शकता. इस्त्रीची वायर गुंडाळून ती घड्याळ्याच्या मदतीने इस्त्रीला बांधा.
दुसरं म्हणजे छत्री गुंडाळून ठेवायला त्यावर असलेली स्ट्रिप बर्याचदा तुटते. त्यावेळी तुम्ही छत्रीवर घड्याळ लावून ठेवू शकता.
तिसरं म्हणजे एखादं आर्टिफिशियल फूल घड्याळावर चिकटवा आणि हे घड्याळ पडद्याला गुंडाळून ठेवा.
Kitchen tips with esha युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
