तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ बनवत असाल तर रिकाम्या बाटलीचा तसा तुम्ही बऱ्याच पद्धतीने वापर केला असेल. त्यापासून काही ना काहीतरी वेगळं बनवलं असेल. पण तुमची ही बाटली कपाटही बनू शकते, याचा तुम्ही कधी तरी विचार केला होता. प्लॅस्टिक बाटलीत तुम्ही इतके कपडे ठेवू शकता की तुम्हाला कपाटाची गरजच पडणार नाही.
Kitchen Jugaad - चहाच्या गाळणीचा वापर करून बनवा मऊसूद चपाती; कसं ते पाहा VIDEO
advertisement
महिलेने व्हिडीओत दाखवल्यानुसार एक प्लॅस्टिक बाटली घ्या. त्याचा वरील झाकणाकडील थोडा भाग कापून टाका. आता एक सुरी घेऊन बाटलीवर थोड्या थोड्या अंतराने चिर द्या. आता बाटलीला चिर दिला आहे, तिथं कात्री टाकून बाटलीचे गोलाकार आकारात भाग करा. बाटलीच्या गोलाकार स्ट्रिप्स कापून घ्या. आता कपड्यांचा एक हँगर घ्या. शक्यतो मधून उघडेल असा हँगरच घ्या. तो हँगर उघडा आणि त्यात या प्लॅस्टिक बाटलीच्या कापलेल्या स्ट्रिप्स टाका.
आता हँगरमध्ये टाकलेल्या या स्ट्रिप्समध्ये तुमचे एकेएक कपडे ठेवा. अशाच पद्धतीने एकाच हँगरमध्ये अनेक कपडे तुम्ही अगदी नीटपणे ठेवू शकता.
Creator Search 2.0 युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.
(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
