advertisement

Kitchen Jugaad - चहाच्या गाळणीचा वापर करून बनवा मऊसूद चपाती; कसं ते पाहा VIDEO

Last Updated:

चपाती बनवताना चहाच्या गाळणीचा वापर एका गृहिणीने दाखवला आहे.

किचन जुगाड
किचन जुगाड
नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर : सामान्यपणे चहाची गाळणी आपण चहा गाळण्यासाठी वापरतो. पण याच गाळणीचा वापर तुम्हाला चपाती बनवतानाही होतो हे तुम्हाला माहिती आहे का? चहाच्या गाळणीचा जबरदस्त असा उपयोग एका गृहिणीने दाखवला आहे. या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
गृहिणींनी किचनमध्ये बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. पण त्या समस्यांवरही त्या काही ना काही घरगुती जुगाड करतात. पण तरी चहाच्या गाळणीचा वापर करून चपाती कशी बनवायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आता ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल.
व्हिडीओत तुम्ही पाहाल तर महिला आपण सामान्यपे जशी चपाती बनवतो तशीच बनवते. ती चपाती गॅसवर शेकवते. चिमट्याने काढून ती भांड्यात ठेवते. पण तुम्ही पाहिलं असेल गॅस किंवा तव्यावरून चपाती थेट भांड्यात ठेवली की सर्वात आधी केलेली चपाती जी तळाला असते, त्याला पाणी सुटतं. इथंच तुम्हाला ही चहाची गाळणी कामी येणार आहे.
advertisement
चपातीवर वाफ असते त्यामुळे चपाती जेव्हा आपण थेट भांड्यात ठेवतो आणि ती थंड होते तेव्हा त्या वाफेचं रूपांतर पाण्यात होतं. चपातीला पाणी सुटतं आणि ती ओली होते. त्यामुळे गॅस किंवा तव्यावरून चपाती काढल्यानंतर ती थेट भांड्यात ठेवू नका. तर आधी चहाच्या गाळणीवर काढा. म्हणजे चपातीची वाफ निघून जाईल. किंचितशी ती थंड होईल. त्यानंतर भांड्यात ठेवा. चपातीला वाफ नाही, त्यामुळे चपातीला पाणीही सुटणार नाही.
advertisement
kitchen Tips and tricks युट्यूब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad - चहाच्या गाळणीचा वापर करून बनवा मऊसूद चपाती; कसं ते पाहा VIDEO
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement