TRENDING:

Kitchen Jugaad Video : फक्त 10 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा चष्मा; परिणाम पाहून आश्चर्यचकीत व्हाल

Last Updated:

फ्रिजमध्ये चष्मा ठेवण्याचा हा जबरदस्त असा जुगाड एका गृहिणीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर : आतापर्यंत फ्रिजमध्ये तुम्ही पाण्याची बाटली, कोल्ड ड्रिंक, आईस्क्रिम, फळं-भाज्या, दूध, शिल्लक पदार्थ असं काही ना काही ठेवत आलात. पण कधी फ्रिजमध्ये चष्मा ठेवून पाहिला आहेत का? फ्रिजमध्ये चष्मा ठेवताच अशी कमाल होते की तुम्ही विचारही केला नसेल. फ्रिजमध्ये चष्मा ठेवण्याचा आश्चर्यकारक असा परिमाण आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
किचन जुगाड (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
advertisement

एका गृहिणीने शेअर केलेला चष्मा आणि फ्रिजच्या जुगाडाचा हा व्हिडीओ. गृहिणींकडे किती तरी घरगुती जुगाड असतात. अशाच जुगाडापैकी हा एक जुगाड. ज्यात या गृहिणीने फ्रिजमध्ये चष्मा ठेवून दाखवला आहे आणि त्याचा काय फायदा, काय परिणाम होतो, ते तिने दाखवलं आहे. अगदी सोपा असा उपाय आहे पण त्याचा फायदा मात्र खूप मोठी आहे.

advertisement

Kitchen Jugaad Video - शेगडीवर ठेवा फक्त 2 प्लॅस्टिकच्या बाटल्या; गॅस लवकर संपणारच नाही

व्हिडीओत गृहिणीने सांगितल्यानुसार तुमच्या घरात जितके चष्मे असतील ते फ्रिजच्या फ्रिजरमध्ये ठेवा. पण चष्मे फ्रिजरमध्ये ठेवण्याआधी फ्रिज बंद करा. चष्मे फ्रिजरमध्ये ठेवल्यानंतर फ्रिजचा दरवाजा बंद करा. 10-15 मिनिटांनंतर हे चष्मे फ्रिजमधून बाहेर काढा. तुम्ही पाहिलं तर चष्मावर वाफ जमा झालेली असेल. आता चष्मा पुसण्यासाठी एक कापड असतो, त्या कापडाने या चष्म्यावरील वाफ पुसून घ्या.

advertisement

बऱ्याचदा आपण चष्मा कुठेही कसाही ठेवतो, कोणत्याही कापडाने त्याची काच पुसतो. त्यामुळे चष्म्यावर ओरखडे आलेले असतात. काही केल्या ते लवकर जात नाहीत. पण तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेला हा चष्मा पुसल्यानंतर पाहा. त्याच्यावरील ओरखडे गायब झालेले दिसतील. चष्म्याची काच एकदम नव्यासारखी स्वच्छ झालेली आहे. जे इतके प्रयत्न करून शक्य झालं नाही ते काही मिनिटांत शक्य झालं आहे.

advertisement

Kitchen Jugaad Video - फुगा झटपट सोलून देईल तुमची लसूण; इथं पाहा सर्वात सोपी पद्धत

Paramjeet kitchen tips या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.  तुम्ही हा उपाय एकदा करून पाहा आणि त्याचा परिणाम कसा वाटला? ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

(सूचना - या लेखात दिलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : फक्त 10 मिनिटं फ्रिजमध्ये ठेवा चष्मा; परिणाम पाहून आश्चर्यचकीत व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल