TRENDING:

Kitchen Jugaad Video : फक्त एक प्लॅस्टिक बाटली गारेगार हवा देईल, लाइट बिलचंही टेन्शन नाही

Last Updated:

Kitchen Tips in Marathi : एका गृहिणीने या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तिने प्लॅस्टिक बाटलीचा वापर करून कमाल करून दाखवली आहे. तिने असा प्लॅस्टिक बाटलीचा असा वापर करून दाखवला आहे की तुमचं लाइट बिल कमी होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यात पंखा, कुलर, एसी, फ्रिज यांचा वापर जास्तच वाढतो. त्यामुळे या कालावधीत वीज जास्त वापरली जाते. परिणामी लाईट बिलही जास्त येतं. पण आम्ही तुमच्यासाठी आता हेच लाइट बिल कमी करण्याचा जबरदस्त जुगाड घेऊन आलो आहोत. तुम्ही विचारही केला नसेल. तुमच्याकडे असलेली एक साधी प्लॅस्टिकची बाटली तुमच्या विजेची बचत करू शकते.
News18
News18
advertisement

प्लॅस्टिकच्या बाटलीमुळे तुमचं लाईट बिल कमी होईल. या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. आता प्लॅस्टिक बाटली आणि विजेचा काय संबंध? प्लॅस्टिक बाटली वापरून वीज कमी कशी काय होईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण एका गृहिणीने या जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तिने प्लॅस्टिक बाटलीचा वापर करून कमाल करून दाखवली आहे. तिने असा प्लॅस्टिक बाटलीचा असा वापर करून दाखवला आहे की तुमचं लाइट बिल कमी होईल. आता नेमकं काय करायचं ते पाहुयात.

advertisement

Kitchen Jugaad : फ्रिजच्या डोअरमध्ये पेपर अडकवा, उन्हाळ्यात जरूर करा हा उपाय, मोठा फायदा

तुम्हाला या प्लॅस्टिक बाटलीचा वापर करायचा आहे तो कुलरसाठी. पण त्यापूर्वी घरात कुलर सुरू करण्याआधी सर्वात महत्त्वाची दोन कामं करा. एक म्हणजे पंखा सुरू करा. यामुळे खोलीतील गरम हवा घराबाहेर जाईल. त्यानंतर पंखा बंद करा. दुसरं म्हणजे जिथं कुलर ठेवणार आहात, तिथली लाइट बंद ठेवा. कारण लाइटमुळे खोलीतील तापमान वाढतं. त्यामुळे कुलरलाही ती खोली थंड करायला वेळ जातो. परिणामी वीज जास्त लागते.

advertisement

आता पाहुयात कुलरसोबत प्लॅस्टिक बाटलीचं काय करायचं? तुम्ही पाहिलं असेल जेव्हा तुमचा कुलर बंद असतो तेव्हा कुलरच्या मागे असलेली गवताची जाळी पूर्णपणे सुकते. जेव्हा कुलर सुरू करतो तेव्हा ती जाळी हळूहळू ओली होते आणि त्यानंतर कुलर हळूहळू थंड हवा देते. पण यासाठी खूप वेळ जातो आणि मग वीजही खूप जाते. त्यामुळे कुलर सुरू करण्याआधी एका प्लॅस्टिक बाटलीत पाणी घ्या आणि या सुकलेलया गवतावर  हे पाणी हळूहळू टाका. सुकलेलं गवत ओलं होईल. आता गवत ओलं करण्यासाठी कुलरला फार वेळ लागणार नाही. जेणेकरून कुलर लवकर थंड हवा देईल, फार वीज वापरणार नाही.

advertisement

Jugaad : गावी जाण्याआधी लॉकरऐवजी टॉयलेटमध्ये ठेवा Gold Jewellery आणि पाहा काय कमाल होते

यामुळे आपसूकच तुमची वीज कमी वापरली जाईल आणि लाइट बिलही कमी होईल. Avika Rawat Foods युट्युब अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

(सूचना : हा व्हिडीओ युट्युब व्हायरल व्हिडीओ म्हणून दाखवण्यात आला आहे. न्यूज 18 मराठी याची हमी देत नाही. पण तुम्ही हा जुगाड नक्की करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.)

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video : फक्त एक प्लॅस्टिक बाटली गारेगार हवा देईल, लाइट बिलचंही टेन्शन नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल