कांदा सामान्यपणे आपण स्वयंपाकात वापरतो. पण कांद्याचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. या गृहिणीने रात्री झोपण्याआधी कांदा गॅसवर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आता कांदा गॅसवर ठेवण्याचा काय फायदा आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता महिलेनं कांद्याच्या गोल चकत्या केल्या आहेत. त्या तिने गॅस आणि किचनवर पसरवून ठेवल्या आहेत. रात्रभर कांदे किचनवर असेच ठेवायचे आहेत. सकाळ झाली की ते उचलून किचन स्वच्छ पुसून घ्यायचा आहे.
advertisement
Kitchen Jugaad Video - दरवाजाचं कुलूप तुमच्या हाताला लावून पाहा; विचित्र आहे पण फायद्याचा उपाय
कांद्याच्या या उपायामुळे किचनवर फिरणारे उंदीर, पाल, झुरळ असे प्राणी-कीटक किचनपासून दूर राहतील. असे जीव किचनवर फिरत राहिल्याने त्यांच्यापासून धोका आहे. पण कांद्याच्या उग्र वासामुळे उंदीर, पाल, झुरळ किचनकडे बिलकुल फिरकणार नाहीत. त्यामुळे यांच्यापासून असलेला धोका तुम्हाला टाळता येऊ शकतो, असं या गृहिणीने सांगितलं आहे. महिलेने यात सांगितल्यानुसार तुम्ही कांद्याशिवाय डांबर गोळी किंवा कापूर गोळीचाही वापर करू शकता. कांदा, कापूर आणि डांबर गोळी यांच्या वासापासून असे प्राणी दूर राहतात.
Kitchen Jugaad Video - टूथपेस्टमध्ये टॉयलेट क्लिनर मिक्स करून वापरा; आहे जबरदस्त फायदा
simply marathi युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज 18 मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)
