advertisement

Kitchen Jugaad Video - दरवाजाचं कुलूप तुमच्या हाताला लावून पाहा; विचित्र आहे पण फायद्याचा उपाय

Last Updated:

कुलूपाचा विचित्र उपयोग एका गृहिणीने दाखवला आहे.

कुलूपाचा अजब वापर (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
कुलूपाचा अजब वापर (फोटो - युट्यूब व्हिडीओ ग्रॅब)
मुंबई, 05 ऑगस्ट : कुलूप किंवा टाळं आपण सामान्यपणे दरवाजाला लावतो. याशिवाय या कुलूपाचा दुसरा काही उपयोग नाही. तुम्हालाही असंच वाटत असेल तर ते चुकीचं आहे. एका गृहिणीने कुलूपाचा आणखी एक उपयोग करून दाखवला आहे. कुलूपाचा असा अनोखा वापर जो विचित्र आहे. पण त्याचा फायदा समजला तर तुम्हीही आश्चर्यचकीत व्हाल. या किचन जुगाडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
एका गृहिणीने कुलूपाचा अजब असा उपाय दाखवला आहे. हे कुलूप तुम्हाला दरवाजाशिवाय तुमच्या हातालाही लावायचं आहे. आता हाताला कुलूप कसं लावणार आणि याचा काय फायदा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्यासाठी व्हिडीओ पाहुयात. व्हिडीओत पाहाल तर गृहिणीने हाताला कुलूप लावलं म्हणजे हातावर ते घासलं आहे. तिने हातावर टाळं-चावी घासण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
आता हे उपाय सर्वांनी करायचा आहे असा नाही. तर एका समस्येसाठी हा उपाय आहे. काही वेळा मधमाशी किंवा तसा किटक चावल्याने त्वचेवर खूप जळजळ होते. अशा जळजळ होत असलेल्या भागावर हे टाळं किंवा चावी घासायची आहे. कुलूप हे लोखंडाचं असतं. ते जळजळ होत असलेल्या भागावर घासल्यास जळजळ कमी होते, असा दावा या महिलेने केला आहे. हा उपाय तात्पुरता आहे. यानंतर उपचारासाठी डॉक्टरकडे जाण्याचा सल्लाही या महिलेने दिला आहे.
advertisement
SEEMA FAMILY VLOG युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
advertisement
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज 18 मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज 18 मराठी याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/Viral/
Kitchen Jugaad Video - दरवाजाचं कुलूप तुमच्या हाताला लावून पाहा; विचित्र आहे पण फायद्याचा उपाय
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement