यासाठी तुम्हाला लागणार आहे रबर आणि फाॅइल पेपर गुंडाळतात तो रोल बॉक्स किंवा तुम्ही जुन्या झाडूचा दांडाही वापरू शकता. या रोल किंवा दांड्यात रबर टाकून घ्या. आता याचा वापर कसा करायचा ते पाहूयात.
हा रबर घातलेला रोल तुम्हाला दरवाजावरील पायपुसणीवर फिरवायचा आहे. यामुळे पायपुसणी स्वच्छ होईल. त्यात अडकलेली माती, केस या रबरला चिकटून येतील. कसे ते महिलेने या व्हिडिओ मध्ये दाखवलं आहे. एरवी तुम्ही पायपुसणीमधून केस काढायला जाल तर ते निघत नाहीत. पण या जुगाडान सहज निघालेले पाहाल.
advertisement
Sangeeta tyagi vlogs युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.
(सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.)
