अंधश्रद्धा निर्मुलनासाठी कायदा झाला तरी अद्यापही करणी, भानामतीचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस येतात. आकुर्डी महालवाडी गावातील कुराण नावाच्या शेतात गवताचा माळ आहे. या माळावर असणाऱ्या बाभळीच्या झाडावर तरुणींना वश करण्यासाठी दाभणाने मुलींचे फोटो लटकावले आहेत. तसेच लिंबू आणि काळ्या बाहुल्यांचा ही या प्रकारात वापर करण्यात आला आहे.
हे बीडमध्येच घडू शकतं! शेतकऱ्यानं 3 गुंठ्यात पिकवली 4 कोटींची अफू, पण...
advertisement
नुकतेच महालवाडी येथील ग्रामदेवतेच्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यानिमित्ताने गावामध्ये विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. इथे असणाऱ्या कुराण माळावर काही ग्रामस्थ ग्राउंड तयार करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हा आघोरी प्रकार निदर्शनाला आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय.
नेमकं काय घडलं होतं ?
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात असणाऱ्या आकुर्डी महालवाडी जवळच कुरण नावाचा माळ आहे. या संपूर्ण दहा एकराच्या माळावर केवळ एकच बाभळीचं झाड आहे. या झाडावर तीन मुलींच्या फोटोवर लिंबू दाबडाने टोचलेले आढळले. तसेच झाडावर बाहुल्याही अडकवण्यात आल्या होत्या. एका बाहुलीवर तरुणीचा फोटो होता. तर दुसऱ्या युवतीच्या आई-वडील आणि आजीचे फोटो या झाडाच्या फांद्यावर लटकवलेले होते. हा अघोरी प्रकार अमावस्येच्या मध्यरात्री घडला असल्याचं बोललं जातंय. तसेच या बाहुल्यांबरोबरच तरुणींचे फोटोही झाडाला बांधले होते आणि त्यासोबत दाबणांमध्ये युतीच्या ड्रेसची बटणे देखील काळ्या दोऱ्यामध्ये अडकवलेली आहेत.
दरम्यान, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी कायदा झाला तरी अद्यापही करणी, भानामतीचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस येतात. एकतर्फी प्रेमातून मुलींना वश करण्यासाठी हा अघोरी प्रकार केल्याचे सांगितले जातेय.






