चीनच्या शांक्सी प्रांतातील हे प्रकरण. कायद्याचे शिक्षण घेतलेली ही व्यक्ती, एक वकील. सामान्यत: कायद्याचे पालन करण्याची जबाबदारी पोलिसांची असते आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वकिलांची असते. इथे एका कायदेतज्ज्ञाने कायदा मोडला आणि तोही कुठेही नाही, थेट देवासमोर. एका उच्च विद्यापीठातून पदवी घेतलेल्या व्यक्तीने देवाचीही फसवणूक केली.
advertisement
ज्याने मंदिरात दर्शन घेताना असं काही केलं की त्याचं नशीबच पालटलं. पण चमत्कार वाटणार्या या घटनेचं सत्य समोर येताच त्याचे परिणाम त्याला भोगावे लागले.
व्यक्तीने मंदिरात केलं काय?
तो दक्षिण-पश्चिम चीनच्या अनेक प्रांतांमध्ये गेला. बौद्ध मठ आणि मंदिरांना भेट दिली. मंदिरात गेल्यानंतर बहुतेक लोक आपली इच्छा देवासमोर व्यक्त करतात आणि देवाची कृपा कधी होईल, याची प्रतीक्षा करतात.
या व्यक्तीने मात्र देवाच्या कृपेची वाट न पाहता तिथं असलेल्या दानपेटीवर गुपचूप आपला QR कोड पेस्ट केला. हे त्याने अनेक मंदिरांमध्ये केलं आणि कोणीही त्याला पाहू शकलं नाही. अशाप्रकारे मंदिरातून 30 हजार युआन म्हणजेच सुमारे साडेतीन लाख रुपये त्याच्या खात्यात जमा झाले.
असं फुटलं बिंग
पण त्याला त्याचं रहस्य फार काळ लपवता आलं नाही. अखेर शांक्सी प्रांताच्या पोलिसांना तो फेमेन मंदिरात पोहोचल्याचे फुटेज मिळाले. नतमस्तक होऊन मंदिराच्या कोडवर त्याने त्याचा QR लावला. त्यानंतर तो अनेक वेळा हात जोडून देवापुढे प्रार्थना करताना दिसला. एवढंच नाही तर दानपेटीत त्याने दानही टाकलं.
एका गावात असं काय घडलं? 47 जिल्हे, 6 राज्यांत दहशत; अधिकारीही घाबरले
पोलिसांनी व्हिडिओच्या माध्यमातून त्याला पकडलं असता त्याने यापूर्वीही अशी फसवणूक केल्याचं उघड झालं, असं वृत्त साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलं आहे.