जगभरातील डॉक्टर आणि परिचारिकांना दररोज रुग्णालयात असंख्य अनुभव येतात. मिरर वेबसाइटच्या अहवालानुसार, अमेरिकेतील एका नर्सने अलीकडेच असाच एक रहस्यमय अनुभव शेअर केला, ज्याचा तिच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला नाही तर तिला मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवण्यास भाग पाडलं. ही घटना एका आपत्कालीन कक्षात घडली.
घराबाहेर खेळत होती मुलगी, तिला पाहताच घाबरली आई; हातात साप आणि खिशात तर...
advertisement
दर मिररच्या रिपोर्टनुसार सोशल मीडियावर @tribenursing म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नर्स मोने सांगितलं की, तिच्या रुग्णालयात एका गंभीर जखमी रुग्णाच्या हृदयाचं ठोकं 20 मिनिटांसाठी थांबले. डॉक्टर त्याला मृत घोषित करणारच होते तेव्हा अचानक मॉनिटरवर हृदयाचे ठोके दिसू लागले. रुग्णाचा श्वासोच्छ्वास परत आला. तो जिवंत झाला.
त्याने सांगितलं, "तो त्याच्या शरीरावर तरंगत होता आणि खोलीत घडणाऱ्या सर्व गोष्टी त्याने पाहिल्या होत्या. तेव्हा मला जाणवलं की खरोखर एक उच्च शक्ती अस्तित्वात आहे." या अनुभवानंतर, मोने तिच्या सहकारी नर्सना विचारलं, "असा क्षण कधी होता जेव्हा तुम्हाला वाटल की खरोखरच एक दैवी शक्ती अस्तित्वात आहे?" शेकडो लोकांनी त्यांचे अलौकिक अनुभव शेअर केले. काही प्रेरणादायी, काही भयानक.