इंदूरच्या बाणगंगा परिसरातील गोविंद कॉलनीत राहणारी सोनम रघुवंशी तिचा पती राजा रघुवंशीसोबत हनीमूनला शिलाँगला गेली होती. तिथं राजा संशयास्पद परिस्थितीत मरण पावला, तर सोनम अजूनही बेपत्ता आहे. या प्रकरणाने केवळ कुटुंबच नाही तर संपूर्ण परिसर चिंतेत आहे.
सोनम आणि राजाचं लग्नाचा 11 मेचा शुभमुहूर्त पंडित एनके पांडे यांनी काढला होता. त्याचवेळी त्यांनी विदाईसाठीही मुहूर्त काढला होता. जो 5 जूनचा होता. याआधी निघणं शुभ नव्हतं. पण सोनम आणि राजा यांनी याआधी प्रवास करण्याची योजना आखली होती आणि ते पूर्वेकडे म्हणजेच कामाख्या दर्शनासाठी निघाले. तिथून ते शिलाँगला पोहोचले.
advertisement
पंडित एन.के. पांडे यांच्या मते, 22 मे रोजी ही घटना घडली तेव्हा देवी सिंह 23 मे रोजी माझ्याकडे आले होते. त्यानंतर मी सोनमची कुंडली देखील पाहिली होती. राजा आणि सोनम यांना शोधण्यासाठी मी ज्योतिषची मदत घेतली. त्यानंतर मला तीन गोष्टींची माहिती मिळाली. पहिलं दोघंही पूर्वेला गेले आहेत. दुसरं त्यांच्या बेपत्ता होण्यात काही महिला सहभागी आहे. तिसरं राजा आणि सोनमच्या कामाच्या पूर्ततेत विलंब होईल.
पंडितजींनी सांगितलेली माहिती जवळजवळ खरी निघाली. राजा आणि सोनम पूर्वेला म्हणजेच शिलाँगला गेले होते. इतके दिवस उलटून गेले पण सोनम सापडली नाही, याचा अर्थ काम पूर्ण होण्यास उशीर होत आहे. त्याच वेळी, सोनम सापडल्यानंतरच एखाद्या महिलेशी असलेले संबंध उघडपणे कळतील. जर या दोन्ही गोष्टी खऱ्या ठरल्या तर त्या महिलेबद्दलची गोष्टही खरी असेल.
Chanakya Niti : तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत नाहीये ना? चाणक्यनीतीत सांगितलंय कसं ओळखायचं?
सोनमचे वडील देवीसिंग रघुवंशी यांनी शेजारी पंडित एनके पांडे यांना यावर उपाय विचारला. तेव्हा त्यांनी मुलीचा फोटो घराबाहेर उलटा लावण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की, हा एक प्रकारचा टोटका ज्यामुळे तिचं सुरक्षित परतणं सुनिश्चित होईल. धार्मिक उपायांनी मार्ग निघेल असा देवी सिंह यांचा विश्वास आहे. परिसरातील लोकांनीही सोनमच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली आहे.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही किंवा याचं समर्थन करत नाही.)