महाभारत युद्ध आणि अश्वमेध यज्ञ महाभारत युद्धानंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला. या यज्ञात, घोड्याला मुक्तपणे फिरण्यासाठी सोडण्यात आलं होतं आणि जो राजा तो घोडा पकडत असे त्याला पांडवांचे वर्चस्व स्वीकारावं लागत असे किंवा युद्ध करावं लागत असे.
Mahabharat : महाभारत युद्धात मारले गेलेले योद्धे, 15 वर्षांनी पुन्हा जिवंत झाले, पण कसे?
advertisement
मणिपूरमध्ये अर्जुन आणि बब्रुवाहन यांची भेट
जेव्हा घोडा मणिपूरला पोहोचला तेव्हा तिथला राजा बभ्रुवाहन होता जो अर्जुन आणि त्याची पत्नी चित्रांगदा यांचा मुलगा होता. बब्रुवाहनाने आपल्या वडिलांचं स्वागत केलं पण जेव्हा अर्जुनाने अश्वमेध यज्ञाचा घोडा सोडण्यास सांगितलं तेव्हा बब्रुवाहनला युद्ध करण्यास भाग पाडलं.
पिता-पुत्रातील युद्ध आणि अर्जुनाचा मृत्यू
अर्जुन आणि बभ्रुवाहन यांच्यात घनघोर युद्ध झालं. बब्रुवाहनाने त्याच्या वडिलांचा पराभव केला आणि तो मरण पावला. या घटनेने बब्रुवाहन आणि चित्रांगदा यांना खूप दुःख झालं.
Mahabharat : महाभारत युद्धासाठी श्रीकृष्णाने कुरूक्षेत्रच का निवडलं?
अर्जुनाचे पुनरुज्जीवन
जेव्हा श्रीकृष्णाला ही घटना कळली तेव्हा त्यांनी बभ्रुवाहनला अर्जुनला पुन्हा जिवंत करण्याचा मार्ग सांगितला. बब्रुवाहनाने कृष्णाने सांगितल्याप्रमाणे केलं आणि अर्जुन पुन्हा जिवंत झाला.
ही कथा आपल्याला शिकवते की आपण आपल्या तत्वांचं आणि परंपरांचं पालन केलं पाहिजे. परंतु त्याच वेळी आपण आपल्या विवेकाची आणि भावनांची देखील काळजी घेतली पाहिजे. अर्जुनाने अश्वमेध यज्ञाच्या नियमांचे पालन करून आपल्या मुलाशी युद्ध केलं. पण त्याचा परिणाम इतका दुःखद होईल याची त्याला कल्पना नव्हती.