थायलंडच्या चुम्फोन प्रांतातील लांग सुवानमधील ही घटना. एका डोरियन व्यापाऱ्याने आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी उचललेलं पाऊल सोशल मीडियावर वादळ निर्माण करत आहे. अनेक जण या निर्णयाचा निषेध करत आहेत, तर काही जण त्या माणसाला पाठिंबा देत आहेत. अर्नॉन रोथोंग असं या व्यक्तीचं नाव. 60 वर्षांचा अर्नॉनएका मोठ्या डोरियन वेअरहाऊसचा मालक आहे. त्याने फेसबुक पोस्टमध्ये आपल्या मुलाच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला.
advertisement
बायको असताना गर्लफ्रेंडसोबत रोमान्स, उद्ध्वस्त झाला, प्रायव्हेट पार्ट गमावला
अर्नॉनच्या मुलाचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध आहे. अर्नॉनच्या सुनेने आपल्या पतीला रंगेहाथ पकडलं. अर्नॉनच्या मुलाने आपल्या बायकोला बंदुकीचा धाक दाखवला. तिने चुम्फोनमधील बान नाई हुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. स्वतःला कुटुंबाचा प्रमुख मानणाऱ्या अर्नॉनला यामुळे खूप वाईट वाटलं. त्याने सुनेला साथ दिली.
फेसबुकवर पोस्ट करून त्याच्या मुलाचं रिलेशन असलेल्या त्या महिलेचं नाव आणि ओळख उघड केली, जी पूर्वी त्याच्या गोडाऊनमध्ये काम करत होती. तिचं लग्न अर्नॉनच्या पुतण्याशी झालं आहे. अर्नॉनचा आरोप आहे की महिलेने तिच्या पतीचा विश्वासघात केला आणि त्याच्या मुलाशी प्रेमसंबंध सुरू केले.
नवऱ्याला हवा होता मुलगा, लागोपाठ प्रेग्नंट होत राहिली बायको, सहाव्या बाळाला पाहून सगळे किंचाळले
बहुतेक कुटुंबे अशा चुका लपवण्याचा प्रयत्न करत असताना, अर्नॉनने आपल्या मुलाला आणि त्याच्यासोबत रिलेशन असलेल्या महिला धडा शिकवण्यासाठी अर्नॉनने खास ऑफ दिली.
त्याने मुलाच्या गर्लफ्रेंडला 10 वेळा थप्पड मारणाऱ्याला 30000 थाई बात म्हणजे अंदाजे 81000 रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली. त्याने फेसबुक पोस्टवर म्हटलं, "माझ्या मुलाच्या गर्लफ्रेंडला मारणाऱ्याला लांग सुवान जिल्ह्यातील प्रत्येक टोळीला मी 30000 बाहट देईन. किमान 10 वेळा तोंडावर थप्पड मारावी लागेल. हे प्रकरण संपेपर्यंत हे बक्षीस वैध राहील आणि तो पोलिसांचा कोणताही दंड भरेल"
शिवाय त्याने त्याच्या मुलाविरुद्ध कारवाईची घोषणा केली आहे. त्याने त्याच्या मुलाच्या पिकअप ट्रकचं मॉडेल आणि नोंदणी क्रमांक शेअर केला आहे आणि पोलिसांना त्याला थांबवण्याची विनंती केली आहे, कारण त्याच्याकडे ट्रकमध्ये दोन बेकायदेशीर शस्त्रं आहेत. त्याच्या मुलाला अटक करण्यासाठी पोलिसांना 50000 बाहटचं वेगळं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.
अर्नॉन म्हणाला, "मी म्हातारा झालो आहे, मी स्वतः ते हाताळू शकत नाही. पण मी माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी काहीही करेन." ही पोस्ट त्याच्या फेसबुक पेजवर आधीच हजारो शेअर झाली आहे.