नवऱ्याला हवा होता मुलगा, लागोपाठ प्रेग्नंट होत राहिली बायको, सहाव्या बाळाला पाहून सगळे किंचाळले
- Published by:Priya Lad
Last Updated:
Family Video Viral : एका कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. महिलेने शेअर केलेला हा व्हिडीओ, जिने आपल्या पतीला मुलगा हवा असल्याचं सांगितलं.
नवी दिल्ली : आजही कित्येकांना मुलगी नको मुलगा हवा असतो. लागोपाठ मुली झाल्या तरी मुलाची आस काही सोडली जात नाही. अशीच मुलगा हवी असणारी एक व्यक्ती, ज्याची पत्नी प्रेग्नंट होत राहिली, तिने तब्बल 5 मुलींना जन्म दिला. सहावं बाळ पाहून सगळे किंचाळले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
एका कुटुंबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. महिलेने शेअर केलेला हा व्हिडीओ, जिने आपल्या पतीला मुलगा हवा असल्याचं सांगितलं. व्हिडीओत महिला सुरुवातीला एकटी दिसते. तिच्या हातात एक ड्रेस आहे जी तो खाली फेकते आणि त्याठिकाणी एक मुलगी येते. मग मुलगी आईसारखंच हातात ड्रेस घेऊन खाली फेकत पुन्हा दुसरी मुलगी दिसते. असं एकएक करत मुली ड्रेस फेकतात आणि महिलेनंतर एका रांगेत 5 मुली दिसतात.
advertisement
व्हिडीओच्या शेवटी एक पुरुष तिथं येतो. जो पाचव्या मुलीच्या हातात ड्रेस देतो आणि मग ती मुलगी ड्रेस फेकते. तर जमिनीवर बसलेलं एक बाळ दिसतं. त्याला पाहून महिलेसह सगळ्या मुली किंचाळतात. हा बाळ मुलगा आहे, असं या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. ज्याला पाहून त्यांना आनंद होतो आणि आनंदाने, उत्साहाने त्या ओरडताना दिसतात.
advertisement
advertisement
@whataboutaub या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहे. सुंदर कुटुंब, वडिलांना मुलगा हवा पण त्यांचं प्रेम मुलींवर जास्त असतं, हे सुंदर आहे, अशा कमेंट या व्हिडीओवर आल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 12, 2025 9:29 AM IST
मराठी बातम्या/Viral/
नवऱ्याला हवा होता मुलगा, लागोपाठ प्रेग्नंट होत राहिली बायको, सहाव्या बाळाला पाहून सगळे किंचाळले