थायलंडची राजधानी बँकॉकमधील ही घटना. कुंग नट्टापोन नावाची व्यक्ती. ज्याचा फोन सोई चेंग वथाना 14 परिसरातल हरवला होता. त्याने फोन खूप शोधला. अखेर त्याला त्याचा फोन सापडला. त्याला खूप आनंद झाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. उत्साहात त्याने आपला फोन ऑन केला तो फोनच्या फोटो गॅलरीत गेला आणि त्याला मोठा धक्का बसला, दरदरून घाम फुटला.
advertisement
नारळाच्या झाडाच्या खोडातून विचित्र आवाज, तोडताच विस्फारले डोळे, लोक घाबरले
फोनच्या गॅलरीत मानवी सांगाड्याचे अवशेषाचे फोटो होते. त्याने कधीच हे फोटो काढले नव्हते. त्यामुळे तो घाबरला आणि त्याने लगेच पोलिसांना फोन केला. फोनचे फोटो पाहिल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब कारवाई केली. ज्या भागात फोन हरवला होता त्या भागातील एका जुन्या इमारतीचा शोध पथकाने सुरू केला. तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर त्यांना एक भयानक दृश्य दिसलं. गादीवर कुजलेल्या मानवी सांगाड्याचे अवशेष पडले होते. घटनास्थळी असलेल्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी मृतदेह सुमारे तीन ते चार महिने तिथेच पडून असल्याचं सांगितलं. ज्यामुळे त्याच्या शरीराचा बहुतेक भाग कुजला.
मुलीच्या केसातून आवाज, सगळे घाबरले; केस मोकळे सोडताच कुटुंब पुरतं हादरलं
मृतदेहाजवळ सापडलेल्या पाकिटातून मृताची ओळख पटली. मृताचं नाव मिस्टर ला. 55 वर्षांची ही व्यक्ती. पोलिसानी त्याच्या भावाशी संपर्क साधला. त्याने सांगितलं की, ला अनेक वर्षांपूर्वी बँकॉकमध्ये काम करण्यासाठी चियांग माई सोडून गेला होता. त्याने नंबर बदलला होता, त्यामुळे एक वर्षापेक्षा जास्त काळ त्याच्या कुटुंबाचा संपर्क नव्हता.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि पोलीस आता त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.