नारळाच्या झाडाच्या खोडातून विचित्र आवाज, तोडताच विस्फारले डोळे, लोक घाबरले
- Published by:Priya Lad
Last Updated:
Weird sound from old coconut trunk : सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. व्हिडिओमध्ये नारळाच्या खोडातून काहीतरी बाहेर पडल्याने सर्वांनाच धक्का बसला.
नवी दिल्ली : झाडांच्या पानाच्या सळसळण्याचा आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल. पण एका ठिकाणी चक्क झाडाच्या खोडातून आवाज येऊ लागला. विचित्र असा हा आवाज ज्यामुळे सगळे घाबरले. नारळाच्या झाडाच्या खोडातून हा आवाज येत होता. हा आवाज नेमका कसला हे पाहण्यासाठी हिंमत करून ते खोड तोडलं, अन्... त्यातून जे बाहेर आलं ते धक्कादायक होतं.
आवाज येणाऱ्या नारळाच्या झाडाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. जो पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. नाराळाच्या खोडाच्या आत असं काही असू शकेल याचा कधी कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. व्हिडिओनुसार लोकांना बऱ्याच काळापासून एका जुन्या नारळाच्या झाडाच्या खोडातून विचित्र आवाज येत होते. जेव्हा एका स्थानिक शेतकऱ्याने कुऱ्हाडीने ते खोड तोडण्याचं धाडस केलं तेव्हा तो स्तब्ध झाला. सुरुवातीला तो भीतीने ओरडला, पण नंतर व्हिडिओद्वारे त्याने आपला अनुभव लोकांसोबत शेअर केला.
advertisement
व्हिडिओमध्ये दिसतंय की हे नारळाचं खोड खूप जुनं होतं. ते बऱ्याच काळापासून मळ्यात पडून होतं, पण काही दिवसांपासून ते आवाज करत होतं. व्यक्तीने ते तोडलं, तेव्हा त्यातून खेकडेच खेकडे बाहेर पडले. खेकड्यांची फौजच त्या खोडात राहत होती. हे खोड अनेक महिन्यांपासून जमिनीवर कुजत होतं, ओल्या मातीवर बसलं होतं. स्थानिक लोक, बहुतेक मच्छीमार आणि शेतकरी यांनी सांगितलं की रात्रीच्या वेळी त्यात भूत असल्यासारखा आवाज यायचा. आम्हाला वाटलं की उंदीर किंवा साप असेल, पण आम्हाला भीती वाटली,"
advertisement
advertisement
व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर खेकडे नारळाच्या खोडात का लपतात यावर वाद सुरू झाला. तज्ज्ञांच्या मते, हे खारफुटी किंवा घोस्ट खेकडे आहेत, जे ओल्या कुजलेल्या लाकडाचे पोकळ भाग पसंत करतात. नारळाचे खोड ओलावा शोषून घेतात, आत थोडी हवा सोडतात, ज्यामुळे ते खेकड्यांसाठी परिपूर्ण आश्रयस्थान बनतात. आत, ते अंडी घालतात, शिकार करतात आणि लपतात. एका अभ्यासात असं आढळून आलं आहे की उष्णकटिबंधीय जंगलातील 70% खेकडे अशा झाडांच्या अवशेषांमध्ये राहतात, जिथं ते ओलावा टिकवून ठेवतात.
advertisement
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच प्रतिक्रियांचा पूर आला. कमेंटमध्ये लोक म्हणत आहेत, 'हे दृश्य एखाद्या हॉरर चित्रपटातील सीनपेक्षा कमी नाही!' पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून, तो परिसंस्थेचा एक भाग आहे. इंडोनेशियाच्या पर्यावरण विभागाने असा इशारा दिला आहे की असे खोड सावधगिरीशिवाय कापू नयेत, अन्यथा खेकडे पसरू शकतात आणि लागवडीचं नुकसान करू शकतात. खेकडे पिकं खाऊ शकतात.
Location :
Delhi
First Published :
October 02, 2025 2:10 PM IST