31 वर्षांचा बँक मॅनेजर, मेघराज असं त्याचं नाव. तो रात्री 10 च्या सुमारास 3 मित्रांसोबत राजराजेश्वरी नगर परिसरात एका प्रसिद्ध पबमध्ये आला होता. मित्रांनी सांगितल्यानुसार, सर्वकाही सामान्य होतं. ते लोक जेवले, त्यांनी गप्पा मारल्या, बिल भरलं आणि निघण्याची तयारी केली. तेव्हा मेघराज म्हणाला, मला चक्कर येत आहे, मी बाथरूममध्ये जाऊन येतो. तो उठून बाथरूममध्ये गेला. मित्र बाहेर त्याची वाट पाहत होते.
advertisement
Shocking! मोबाईल ऑन केला आणि समोर स्वतःचाच मृत्यू दिसला; महिला घाबरली, हे कसं शक्य आहे?
5 मिनिटं, 10 मिनिटं, नंतर 20 मिनिटं झाली, पण मेघराज परतला नाही. म्हणून मित्रच पुन्हा पबच्या आत गेले. ते बाथरूमजवळ गेले तेव्हा बाथरूमचा दरवाजा आतून बंद आढळला, त्यांनी दरवाजा ठोठावला. बराच वेळ ठोठावल्यानंतरही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा सर्वांना संशय आला. त्यांनी पब मॅनेजरला फोन केला. मग जेव्हा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा आतील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. मेघराज बाथरूममध्ये जमिनीवर पडलेला होता, त्याचा मोबाईल फोन जवळच पडला होता, सिंकखाली तुटलेली काच होती.
पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. डीसीपी (पश्चिम) एस. गिरीश म्हणाले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये मेघराज बाथरूममध्ये जाताना, आतून दरवाजा बंद करताना स्पष्ट दिसत आहे आणि नंतर काही मिनिटं कोणतीही हालचाल झाली नाही. दरवाजा तोडला तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मेघराज मृतावस्थेत होता.
मुलाचे दुसऱ्या महिलेशी संबंध, सासरा सुनेसोबत; खुलेआम दिली अशी ऑफर, सगळीकडे चर्चा
मेघराज एका खाजगी बँकेत मॅनेजर होता. त्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि सहा महिन्यांचा मुलगा आहे. मेघराजचा मृत्यून नेमका कसा झाला, त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे आणि प्रत्येक बाजूने तपास करत आहेत. पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करण्यासाठी गुन्हेस्थळ पथकाला बोलावलं. आता ते पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा करत आहे. या अहवालातून मृत्यूचं खरं कारण उघड होईल.