Shocking! मोबाईल ऑन केला आणि समोर स्वतःचाच मृत्यू दिसला; महिला घाबरली, हे कसं शक्य आहे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Death Date in Mobile Calender : ही महिला तिच्या फोनवर गुगल कॅलेंडर उघडून बसली होती. पुढच्या वर्षीचे शेड्युल इवेन्ट पाहत होती. या शेड्युल इवेंटमध्ये तिला तिचा मृत्यू दिसला.
नवी दिल्ली : स्मार्टफोन सगळ्यांकडे आहे. स्मार्टफोन म्हणजे सोशल मीडियावर वापरणंही आलं. सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अगदी लाइव्ह मृत्यूचे व्हिडीओही. पण एक महिला जिने मोबाईल उघडला आणि तिला दुसऱ्या कुणाचा नाही तर तिचा स्वतःचाच मृत्यू दिसला. हे कसं शक्य आहे? महिला घाबरली. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे पाहुयात.
ही महिला तिच्या फोनवर गुगल कॅलेंडर उघडून बसली होती. पुढच्या वर्षीचे शेड्युल इवेन्ट पाहत होती. या शेड्युल इवेंटमध्ये तिला तिच्या मृत्यूची तारीख आणि वेळ दिसली. माय डेथ नावाने नोंद असलेलेला हा इवेंट. मिररच्या वृत्तानुसार, 14 मे 2026 या तारखेला संध्याकाळी 6 वाजता माय डेथ अशी नोंद होती.
advertisement
मोबाईलमध्ये आपण आपल्याला आठवून द्यायच्या गोष्टी म्हणजे रिमाइंडर, एखाद्याचा बर्थडे किंवा एखाद्या कार्यक्रमाची तारीख सेव्ह करून ठेवतो. पण कुणी आपल्याच मृत्यूची तारीख का सेव्ह करून ठेवेल. महिलेनेही ते केलं नव्हतं. त्यामुळे तिला धक्का बसला.
advertisement
तिने तिच्या पतीला त्याबद्दल सांगितलं. त्याने कॅलेंडरचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो सोशल मीडिया रेडिटवर पोस्ट केला आणि लोकांना याबाबत विचारलं. त्याने सांगितलं, "माझ्या पत्नीने तिच्या फोनवर स्वतःचा मृत्यू पाहिला. हे पाहिल्यानंतर माझी पत्नी पूर्णपणे घाबरली आहे. हे कसं घडलं किंवा ते कसं जोडलं गेलं? ते ट्रॅक करण्याचा काही मार्ग आहे का? कोणी आम्हाला यात मदत करू शकेल का?"
advertisement
नेटिझन्सनी वर्तवलेल्या शक्यता
पोस्ट पाहिल्यानंतर युझर्सनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या. काही युझर्सनी व्यक्तीने काही कारणामुळे पत्नीच्या फोनमध्ये छेडछाड केली असावी असं म्हटलं आहे. तर एका युझरने विचारलं की, "तुम्ही तुमच्या कॅलेंडरमध्ये गोष्टी जोडण्यासाठी अलेक्सा, सिरी किंवा गुगल सारख्या व्हॉइस कमांड असिस्टंटचा वापर करता का? कदाचित ती दुसरी अपॉइंटमेंट जोडण्याचा प्रयत्न करत होती आणि असिस्टंटला गैरसमज झाला असेल. आवाजाचा चुकीचा अर्थ लावला गेला असेल."
advertisement
तिसऱ्या युझरने सांगितलं की ही नोंद डेथ डेट या प्रँक वेबसाइटवरून आली असावी. जी युझर्सना त्यांची स्वतःची किंवा दुसऱ्याची माहिती देऊन मृत्यूची भविष्यवाणी करते. चौख्या युधरने म्हटलं असा इवेंट जुन्या ईमेलशी लिंक असल्याने देखील सेट केला जाऊ शकतो. पाचव्या युझरने म्हटलं, जर जर तुम्ही गुगल कॅलेंडरशी सिंक असाल तर कोणीही तुमच्या कॅलेंडरमध्ये काहीही जोडू शकतं. गेल्या अनेक वर्षांपासून माझं कॅलेंडर स्पॅम इन्विटेशन्सनी भरलेलं आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
October 11, 2025 12:47 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Shocking! मोबाईल ऑन केला आणि समोर स्वतःचाच मृत्यू दिसला; महिला घाबरली, हे कसं शक्य आहे?