यूकेतील ही घटना आहे. एका अत्यंत प्रसिद्ध कौटुंबिक वादावर अखेर निर्णय झाला आहे. कार बूट किंग म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध बिझनसमॅन रिचर्ड स्कॉटचं हे कुटुंब. ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कार बूट फेअर चालवणारा स्कॉटने 2016 मध्ये त्याच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्याच्या घरातील क्लिनर जेनिफर शी लग्न केलं. जी त्याच्यापेक्षा 28 वर्षे लहान होती. या लग्नानंतर रिचर्डने त्याचा मोठा आणि आवडता मुलगा, अॅडम स्कॉटला त्याच्या मृत्युपत्रातून वगळले. रिचर्डच्या मृत्यूनंतर जेनिफरला यांना संपूर्ण इस्टेट आणि फार्मचे वारस म्हणून घोषित करण्यात आलं. ज्याची किंमत सध्या अंदाजे 43 दशलक्ष पाऊंड आहे.
advertisement
लग्न झाल्यापासून सतत तेच! बायकोची नको ती सवय, 25 दिवसांतच नवऱ्याचा गेला जीव
2024 च्या सुरुवातीला, अॅडमने (62 वर्षे) कोर्टात धाव घेतली. त्याने दावा केला की जेव्हा आपल्या वडिलांनी त्यांच्या मृत्युपत्रावर सही केली तेव्हा ते मानसिकदृष्ट्या आजारी होते. त्याचे वडील डिमेंशियाने ग्रस्त होते आणि जेनिफरने त्यांना मृत्युपत्र बदलण्यास भाग पाडलं. अॅडमने सांगितलं की त्याने 40 वर्षे कठोर परिश्रम केले होते. त्यामुळे वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या फार्मचा वारसा आपल्याला मिळेल असा त्याला विश्वास होता.
अॅडमच्या वकिलांनी म्हटलं की त्याने वर्षानुवर्षे शेती सांभाळली होती आणि त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला ही मालमत्ता मिळण्याची अपेक्षा होती. पण 2017 मध्ये रिचर्डने दोन नवीन मृत्युपत्रे तयार केली, ज्यात जेनिफर आणि तिची मुलं गॉर्डन आणि विल्यम रेडग्रेव्ह-स्कॉट यांना प्राथमिक वारस घोषित करण्यात आलं.
दरम्यान जेनिफरच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की रिचर्ड पूर्णपणे शुद्धीवर होता आणि त्याने अॅडमला मृत्युपत्रातून काढून टाकलं होतं कारण त्यांचं नातं पूर्णपणे तुटलं होतं. तसंच त्यांनी दाखवून दिलं की अॅडमला आधीच 10 दशलक्ष पाऊंडपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता आणि जमीन वारशाने मिळाली होती. अॅडमला 2003 मध्ये माहित होतं की त्याचे वडील कदाचित पलटू शकतात. असं असूनही तो शेतीत काम करत राहिला आणि त्याला कोणतेही आर्थिक नुकसान झालं नाही.
नको मला बंगला, गाडी, उंट पाहिजे! नवरदेवाचा हट्ट; पण सासरच्यांनी म्हैस दिली आणि पुढे भयंकर घडलं
कोर्टाने जेनिफरच्या बाजूने निकाल दिला आणि अॅडमचे दोन्ही दावे फेटाळून लावले. न्यायाधीशांनी मान्य केले की रिचर्डला मेंदूच्या विकृतीचा त्रास होता, पण त्यांनी स्पष्ट केलं की मृत्युपत्रातील बदल त्याच्या आजाराचा परिणाम नव्हता तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. त्याच्या मजबूत आणि नियंत्रित विचारसरणीचा परिणाम होता. रिचर्डने त्याच्या हयातीत घेतलेले निर्णय त्याच्या स्वतंत्र इच्छाशक्तीचे परिणाम होते.
रिचर्डच्या मृत्यूच्या वेळी, त्याच्या मालमत्तेचे अधिकृत मूल्य 7 दशलक्ष पाऊंड होतं. पण जेनिफरचा दावा आहे की प्रत्यक्ष किंमत 43 पाऊंड दशलक्ष पेक्षा जास्त आहे. कोर्टाचा या निर्णयामुळे जेनिफर स्कॉट आता 430 कोटी रुपयांच्या मालमत्तेची एकमेव मालक बनली आहे. तर अॅडमला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही.
रिचर्ड आणि जेनिफरचे लग्नही वादात अडकलं होतं. 2016 मध्ये त्यांच्या लग्नात, अॅडमने त्याचे वडील मानसिकदृष्ट्या अक्षम असल्याचा दावा करत समारंभ थांबवण्याचा प्रयत्न केला. पण चौकशीनंतर स्थानिक रजिस्ट्रार आणि वकिलाने रिचर्डच्या मानसिक तंदुरुस्तीची पुष्टी केली आणि लग्न झालं. रिचर्डबाबत कोर्टात सांगण्यात आलं की तो चलाख बुद्धीचा आणि अत्यंत यशस्वी व्यापारी होता. ज्याने एक विशाल मालमत्ता साम्राज्य उभारलं. त्याला एकूण 19 मुलं झाली. पहिल्या पत्नीपासून 6, विवाहबाह्य संबंधांपासून 6 आणि जेनिफरपासून 7.
