21,00,000 रुपयांचे पदार्थ फ्रीमध्ये... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. हे कसं शक्य आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही असेल. जपानमधील हे प्रकरण आहे. नागोया इथं राहणारी 38 वर्षांची ही व्यक्ती, बेरोजगार होती. या व्यक्तीने एकदा-दोनदा नव्हे तर 1000 पेक्षा जास्त वेळा फ्री फूड मागवलं. त्याने स्वस्त स्नॅक्सऐवजी ईल बेंटो, हॅम्बर्गर स्टेक आणि आईस्क्रीम सारख्या महागड्या वस्तू ऑर्डर केल्या. ज्याची किंमत 21,30,000 रुपये आहे. आता हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
advertisement
खरंतर या व्यक्तीने तब्बल दोन वर्षे डिलिव्हरी अॅप डेमा-कॅनच्या रिफंड पॉलिसीचा गैरवापर केला. त्याने अॅपमधील सिस्टम त्रुटीचा फायदा घेत जेवणाचा पुरेपूर आनंद लुटला. त्याने 124 बोगस अकाऊंट तयार केले. प्रत्येकी एक नवीन नाव आणि खोटा पत्ता. त्याने प्रीपेड मोबाइल सिम कार्ड खरेदी केले, खोटे कागदपत्रे सादर केली आणि ओळख टाळण्यासाठी खाती हटवली.
ही व्यक्ती ऑनलाईन फूड ऑर्डर करायची आणि तिला ते मिळतही असे. पण आपल्याला ऑर्डर मिळाली नाही अशी तक्रार करून रिफंड मागायचा. अशा पद्धतीने तो फ्री पदार्थ खात होता. 30 जुलै रोजी त्याने एक नवीन खातं तयार केलं आणि आईस्क्रीम आणि चिकन स्टेक ऑर्डर केलं. डिलिव्हरी मिळाल्यानंतरही त्याने 16000 येन म्हणजे सुमारे 9000 रुपये परत करण्याची विनंती केली. पण यावेळी कंपनीचा संशय निर्माण झाला आणि चौकशीत सत्य उघड झालं. कंपनीने म्हटलं की ते आता त्यांची आयडी पडताळणी प्रणाली कडक करेल आणि संशयास्पद व्यवहार सूचना प्रणाली लागू करेल.
OMG हा काय चमत्कार! मुलाने बागेत टाकले पॉपकॉर्न, काही महिन्यात असं दृश्य, पाहून आई थक्क
सोशल मीडियावरील लोक याला एक स्मार्ट पण लज्जास्पद स्कॅम म्हणत आहेत. एका युझरने लिहिलं, "जर त्याने एवढी बुद्धी वापरली असती तर त्याला नोकरीही मिळू शकली असती."