अमेरिकेतील जोशुआ अल्कोन, त्याची एक्स पत्नी जेसिका आणि त्यांची मैत्रीण अॅबी यांची ही लव्ह स्टोरी. जोशुआ आणि जेसिका लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. दोघांनी लग्न केलं आणि त्यांना चार मुलं झाली. नंतर त्यांचा घटस्फोट झाला तरी हे नातं संपलं नाही. ते एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी आपलं वेगळं नातं अधिक मोकळ्या पद्धतीने स्वीकारलं.
advertisement
लव्ह मॅरेज केलेलं कपल फक्त एका टॉवेलसाठी भांडलं अन् नको तेच घडलं, हसता खेळता संसार उद्धवस्त
जोशुआ, जेसिका आणि अॅबी आता थ्रूपल म्हणजे तीन लोकांचे प्रेमसंबंध म्हणून राहतात. हे तिघंही एकत्र मुलांना वाढवत आहेत. जेसिका आता पाचव्या मुलासह गर्भवती आहे आणि तिने म्हटलं आहे की त्यांच्या सामायिक प्रेमाचं प्रतीक म्हणून येणाऱ्या मुलाला मधलं नाव अॅबीचं दिलं जाईल. जेसिकाने माय एक्स्ट्राऑर्डिनरी लाईफ ट्रूली या यूट्यूब चॅनलवर म्हटलं आहे की, "आई आणि बाबांना एक गर्लफ्रेंड आहे.
त्यांचं खुलं नातं समाजासाठी चर्चेचा विषय बनलं आहे. बरेच लोक त्यांना विचित्र, अनैतिक आणि मुलांना गोंधळात टाकणारे पालक देखील म्हणत आहेत. परंतु हे तिघंही या टीकेची पर्वा करत नाहीत आणि त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगत आहेत. जेसिका म्हणते की, खुले नातेसंबंध ठेवण्याची कल्पना तिची होती. जोशुआने सांगितलं की जेव्हा जेसिकाने त्याला याबाबत सांगितलं, तेव्हा त्याला वाटलं, हे प्रत्येक पुरुषाचे स्वप्न आहे. यानंतर त्याने डेटिंग अॅप टिंडरवर अॅबीचा फोटो पाहिला आणि लगेच म्हणाला, मला ती हवी आहे, मला मदत करा!
मृत बहिणीची अंगठी तरुणीने स्वतःकडे ठेवली, भावाने ती गर्लफ्रेंडला दिली, नंतर घडलं असं की...
तिघांनी सांगितलं की ते बंद त्रिकूट आहेत. म्हणजेच हे नातं बहुप्रेमळ म्हणजे एकापेक्षा जास्त प्रेमसंबंध असं आहे. परंतु त्यात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला स्थान नाही. सर्व निर्णय परस्पर संमतीने घेतले जातात आणि भावनिक आणि शारीरिक संबंध देखील फक्त या तिघांमध्येच मर्यादित आहेत. जेसिका म्हणते, अॅबीसोबतचे माझं नातं इतर सर्वांपेक्षा वेगळं आहे. दोन लोकांकडून इतकं खोल प्रेम मिळणं कधीकधी मला भावनिक करतं.
ऑनलाइन ट्रोलर्स म्हणतात की असं नातं मुलांसाठी गोंधळात टाकणारं असू शकतं. परंतु जोशुआ म्हणाला, मला वाटतं की त्याचा मुलांवर काही परिणाम होईल. पण आतापर्यंत कोणताही नकारात्मक परिणाम दिसला नाही. मुलं अॅबीला सावत्र आई म्हणून नाही तर एक चांगली मैत्रीण मानतात. ते दुसरी आई असणं खूप छान आहे, असं म्हणत ते स्वीकारतात.