कॅनडातील ही व्यक्ती मार्टी बेलांजर असं तिचं नाव. तो अल्बर्टा इथं इंजिनीअर आहे. त्याला ईमेलवर दिवाळीच्या शुभेच्छांचे मेसेज आले. यामुळे त्याला खूप राग आला आणि तो राग त्याने सोशल मीडियावर व्यक्त केला. त्याने भारतीयांना शिवीगाळ करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि या रागामुळे त्याला ट्रोल करण्यात आलं.
मृत रुग्ण, 20 मिनिटांनी अचानक जिवंत झाला; तोंड उघडताच प्रत्येकाच्या अंगावर काटा
advertisement
बेलांजरला दिवाळी आवडत नाही. तो म्हणाला, नेटफ्लिक्सकडून ईमेल मिळाल्यानंतर तो अस्वस्थ झाला होता. बेलांजरला आश्चर्य वाटलं की त्याचा सर्व वैयक्तिक डेटा गोळा केल्यानंतरही सर्व्हिस प्रोव्हाडरसना हे माहित नव्हतं की तो दिवाळी साजरी करत नाहीत. मार्टीने लिहिले, "माझी सर्व वैयक्तिक माहिती गोळा करून तुम्हाला माझ्याबद्दल सर्व काही आधीच माहित आहे. मी ते पुन्हा सांगतो. मी अल्बर्टा येथील एक मध्यमवयीन श्वेत व्यक्ती आहे. ज्याला युद्ध चित्रपट, विज्ञान कथा आणि खऱ्या गुन्हेगारी माहितीपट आवडतात. मला हे बकवास पाठवणं थांबवा. तिसऱ्या जगातील स्थलांतरितांनी माझ्या देशात येऊन उत्सव साजरा केला तरी मला काही फरक पडत नाही."
त्याच्या पोस्टवर कमेंट सेक्शनमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आल्या. अनेक कॅनेडियन लोकांनी बेलांजरशी मिळतीजुळती प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना ख्रिसमसच्या दिवशी कंपन्यांकडून असा ईमेल कधीच मिळाला नव्हता, असं ते म्हणाले. काहींनी या ईमेलकडे दुर्लक्ष करता आलं असतं, पण उगाच राग व्यक्त केला जातो, असं म्हटलं. काहींनी त्याला दिवाळीबाबत या रागासाठी बेघर आणि कचरा असंही म्हटलं. काही दिवसांपूर्वी कॅनेडियन स्टोअरमध्ये दिवाळीच्या थीमवर आधारित चॉकलेट विकल्या जात असल्याचा फोटो वादाचं केंद्र बनला.
घराबाहेर खेळत होती मुलगी, तिला पाहताच घाबरली आई; हातात साप आणि खिशात तर...
यावर्षी कॅनेडियन बातम्यांमध्ये दिवाळीचा बोलबाला होता. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी शुक्रवारी ग्रेटर टोरंटो एरियामध्ये दिवाळी उत्सवात सहभागी झाले आणि म्हणाले की दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय होय. मिसिसॉगा सिटी काऊन्सिलने दिवाळीच्या फटाक्यांवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला. पण आवाज, दुखापत आणि मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी कठोर नियम लागू केले. नवीन नियमांमध्ये फटाके फोडण्याचा वेळ संध्याकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत ठरवण्यात आली. रोमन मेणबत्त्यांवर बंदी, विक्री कालावधी कमी करणं आणि परवानाधारक विक्रेत्यांना इन्व्हेंटरी आणि विक्रीचे आकडे नोंदवण्याची आवश्यकता यांचा समावेश आहे. शेवटच्या क्षणी खरेदी रोखण्यासाठी, मिसिसॉगामध्ये आता सुट्टीच्या दिवशी फटाक्यांची विक्री करण्यास मनाई आहे.