TRENDING:

OMG! विशीत लग्न, तिशीत झाली 2 मुलं, चाळीशीत कपल...; मुलांनाही लाजवेल असा VIDEO

Last Updated:

Couple video viral : एका महिलेने एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि तिने तिच्या आयुष्याबद्दल सांगितलं आहे. या महिलेचं लग्न तरुणपणात झालं. वयाच्या तिसाव्या वर्षी तिला दोन मुलं झाली. आता वयाच्या चाळीशीव्या वर्षी हे जोडपं असं आयुष्य जगत आहे की ते पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसणार नाही. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : सोशल मीडियावर कित्येक लोक आपलं खासगी आयुष्यही शेअर करत असतात. अशाच एका महिलेने तिच्या लाइफचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. विशीत लग्न करणारी ही महिला. जिला तिशीत 2 मुलं झाली. आता ती चाळीशीत तिच्या नवऱ्यासोबत असं आयुष्य जगत आहे की, पाहणाऱ्या प्रत्येकाने तोंडात बोटं घातली आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचा विश्वास बसत नाही आहे.
News18
News18
advertisement

रजनी सिंह असं या महिलेचं नाव आहे, तिने तिच्या @rajni_singh.official या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपलं 20 ते 40 वर्षांचं आयुष्य दाखवलं आहे. रजनीच्या प्रोफाइलवरून ती ब्रिटनमध्ये राहते हे दिसून येतं.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता ती नवऱ्यासोबत नवरीच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तिनं व्हिडीओमध्ये दिलेल्या कॅप्शनुसार हा तिच्या लग्नाचा फोटो आहे. तिनं आपलं लग्न वयाच्या 23 व्या वर्षी झाल्याचं सांगितलं आहे. त्याचवेळी ती आणि तिचा नवरा विशीत कसे दिसत होते, याचेही काही फोटो तिने दाखवले आहेत.

advertisement

हात वर करून पाहा, सापडेल परफेक्ट लाइफ पार्टनर, डॉक्टरांनीच सांगितला विचित्र मार्ग

यानंतर ती तिच्या तिसाव्या वर्षाचा एक फोटो दाखवते, ज्यामध्ये तिची दोन्ही मुले दिसत आहेत. या काळात, रजनी आणि तिचा नवरा अगदी पूर्वीसारखेच वयाचे दिसतात. पण हे जोडपं जेव्हा त्यांच्या चाळीशीत प्रवेश करतात तेव्हा मात्र ते पूर्णपणे बदलेले दिसता. त्यांचा लूक पूर्णपणे बदललेला दिसतो. रजनी आणि तिचा नवरा दोघंही त्यांच्या वयापेक्षा खूपच तरुण दिसतात. वयाच्या चाळीशीत ते विशीसारखे दिसतात. जणू त्यांचं वय पुन्हा मागे आल्यासारखं वाटत आहे. अगदी त्यांची मुलंही त्यांना शोभत नाहीत.

advertisement

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही आश्चर्य वाटेल आणि प्रश्न पडेल की हे जोडपं या वयात असं आयुष्य कसं जगत आहे? पण हे सर्व रजनी आणि तिच्या पतीच्या मेहनतीचं फळ आहे. त्यांच्यातील बदल पाहून दोघंही त्यांच्या फिटनेसबाबत किती जागरूक आहेत याचा अंदाज येतो.

Breakup Story : ऐकावं ते नवल! WiFi मुळे कपलचं ब्रेकअप, नेमकी भानगड काय?

advertisement

रजनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ कोट्यवधींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याच वेळी, लाखो लोकांनी या रीलला लाईक आणि शेअर केलं आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. बहुतेकांनी यावर विश्वास ठेवणं कठीण असल्याचं म्हटलं आहे. तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
OMG! विशीत लग्न, तिशीत झाली 2 मुलं, चाळीशीत कपल...; मुलांनाही लाजवेल असा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल