महाकुंभात मोनालिसा गजरे विकून आपला उदरनिर्वाह चालवत होती, पण आज ती आलिशान जीवनशैली जगत आहे. तिने तिच्या 'साधगी' गाण्याने अभिनयाच्या दुनियेत पाऊल टाकले आहे. तिचा पहिला म्युझिक व्हिडीओ उत्कर्ष सिंहसोबत प्रदर्शित झाला आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडत आहे.
मोनालिसा किती कमावतेय?
नुकतेच इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना मोनालिसाने ती किती कमाई करत आहे, हे सांगितलं. खरं तर, जेव्हा व्हायरल गर्लला विचारण्यात आलं की, 'लोक म्हणतात की तुम्ही आता लाखो-करोडो रुपये कमवत आहात; मग तुम्ही किती कमवत आहात?'
advertisement
मोनालिसाने सांगितलं ती किती कमावतेय
या प्रश्नाचं उत्तर तिने हसत दिलं. ती म्हणाली, "हो... ही बाबा महाकाल आणि गंगा मैय्याची कृपा आहे... थोडंफार येतंय आणि लोक जे बोलतात ते खरं झालं, तर करोडो आणि अब्जो रुपयेही आले तर चांगलं होईल."
युजर्सना मोनालिसाचं गाणं आवडलं
व्हायरल गर्ल मोनालिसाचा पहिला म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित होताच प्रेक्षकांनी त्याला खूप प्रेम दिलं. एकाने लिहिलं की, मोना खूप सुंदर आहे. तर दुसऱ्याने लिहिलं की, ती खूप सुंदर, नशिबवान मुलगी आहे. आणखी एका वापरकर्त्याने म्हटलं, 'म्हणूनच तिचं नाव मोनालिसा आहे; तुम्ही तिला ज्या दृष्टीने बघाल, ती तशीच दिसेल. खूप छान गाणं.' काही वापरकर्त्यांनी लाल हार्ट इमोजी देऊन तिला प्रेम दिलं आहे. तर काहीजण तिच्या मेहनतीचं कौतुक करत आहेत.
हे ही वाचा : हटके नाव अन् भन्नाट चव! 'या' मिठाईचं नाव ऐकाल, तर पोट धरून हसाल, कुठे मिळते ही मिठाई?
हे ही वाचा : बाप रे... महिलेच्या कानात घुसला साप; काढण्याचा होतोय प्रयत्न, VIDEO पाहून लोकांनी उपस्थित केले प्रश्न!
