नारोळमधील ही घटना. 27 वर्षांची अंजली जिचं लग्न 2019 मध्ये परेशशी झालं. दोघंही राजपिपळा इथं राहत होते. गेल्या आठवड्यात त्या दोघांमध्ये भांडणं झाली. त्यानंतर अंजली रागात सासर सोडून नारोळला माहेरी आली. परेशने तिला बऱ्याचदा घरी परत आणण्याचा प्रयत्न केला, पण परिस्थिती आणखी बिकट झाली.
वहिनीने मैत्रिणीशी ओळख करून दिली, थेट रूममध्येच नेलं; नंतर दीरासोबत घडलं ते भयंकर
advertisement
17 ऑक्टोबरच्या संध्याकाळी परेश त्याचा मित्र जिग्नेशसोबत बाईकवरून नारोळला अंजलीच्या आईवडिलांच्या घरी आला. त्याने सासू दिनाबेनला विचारलं की, "तुम्ही तुमच्या मुलीला माझ्या घरी का पाठवत नाही?" यानंतर त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि परिस्थिती हिंसाचारात बदलली.
रागाच्या भरात परेशने शस्त्र बाहेर काढून सासूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दिनाबेनने लगेचच वीट उचलली आणि त्याच्या डोक्यात मारली. परेश खाली कोसळला. त्यानंतर सासूने तिच्या जावयावर काठीने अनेक वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आलं.
नको मला बंगला, गाडी, उंट पाहिजे! नवरदेवाचा हट्ट; पण सासरच्यांनी म्हैस दिली आणि पुढे भयंकर घडलं
या घटनेनंतर मुलगी अंजलीने तिची आई दिनाबेनविरुद्ध नारोळ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. दिनाबेनने तिचा जावई परेशविरुद्धही तिच्या मुलीवर हल्ला केल्याचा आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही पक्षांच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. दिनाबेनला अटक केली आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नारोळ परिसरात ही बातमी पसरताच लोक स्तब्ध झाले. शेजाऱ्यांच्या मते, अंजली आणि परेशमध्ये पूर्वी भांडण झालं होतं, पण यावेळी परिस्थिती गंभीर झाली. घटनास्थळी कोण उपस्थित होते आणि कोणी भांडण भडकवले याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, हे प्रकरण कौटुंबिक वादातून उद्भवलं आहे, ज्यामध्ये स्वसंरक्षण आणि जाणूनबुजून हत्या असे दोन्ही पैलू आहेत. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि जबाबांच्या आधारे सध्या तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितलं की, "परिस्थिती काहीही असो, कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी नाही."