उत्तर प्रदेशमधील ही घटना आहे.
गोरखपूर जिल्हा रुग्णालयात 15 डिसेंबर रोजी एका महिलेने एका मुलाला जन्म दिला. बाळ खूप रडत होतं. त्याची प्रकृती गंभीर होती. त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. त्याला स्पेशल न्यूबॉर्न युनिट (SNU) मध्ये दाखल केलं. पण आईने बाळाला स्वीकारण्यास नकार दिला. त्याला ती आपलं दूधही पाजायला तयार नव्हती. डॉक्टरांनी आईला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण ती काही ऐकत नव्हती. मुलाला हवं तिथं सोडा, हवं तर कचऱ्यात फेकून द्या, असं ती म्हणाली. हे ऐकून डॉक्टरही शॉक झाले.
advertisement
बाळाला दूध का पाजत नव्हती आई?
यामागील कारण विचारलं असता, तिने आपली संपूर्ण स्टोरी सांगितलं. महिला म्हणाली, दैनिक भास्करशी बोलताना महिलेने सांगितलं, " कुटुंबाच्या इच्छेनुसार एक वर्षापूर्वी माझं लग्न झालं. माझा नवरा ड्रायव्हर, आम्ही बिहारमधील दरभंगा इथं आनंदाने राहत होतो. लग्नाच्या काही महिन्यांनंतर माझा नवरा मला दिल्लीला घेऊन गेला. सुरुवातीला सगळं ठीक होतं. माझा नवरा माझ्याशी खूप आदराने वागायचा मला राणीसारखं वागवेल, असं म्हणायचा. पण पाच महिन्यांपूर्वी तो अचानक मला सोडून गेला. मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला, पण तो माझा फोन उचलत नव्हता.
नंतर एक दिवस त्याचाच फोन आला आणि त्याने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी परत येणार नाही, तू स्वतःची काळजी घे, असं तो म्हणाला. माझ्या नवऱ्याने मला सगळीकडे ब्लॉक केलं आहे. मी नवीन नंबरवरून फोन केला तरी तो माझा फोनही उचलत नाही. नंतर मला तो एका मुलीसोबत पळून गेल्याचं समजलं. तेव्हा मी 4 महिन्यांची गरोदर होती. माझे आईवडीलही या जगात नाही, की मी त्यांच्याकडे आधार मागेन. माझ्या सासरच्या घरी फक्त माझी सासू आहे. माझा तिच्याशीही संपर्क नाही. मी पूर्णपणे एकटी होते. काय करावं हे मला समजत नव्हतं. माझं संपूर्ण जग उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत होतं.
उदरनिर्वाहासाठी मी लोकांच्या घरात स्वयंपाक करायला सुरुवात केली. आम्ही दिल्लीत एका लहान भाड्याच्या घरात राहत होतो. आता मी काम करून मिळवलेले थोडे पैसे भाडे भरण्यासाठी वापरत असे. मी ज्या घरी काम करत असे त्याच घरी जेवत असे. जेव्हा डिलीव्हरी जवळ आली तेव्हा मी माझ्या गावी जाण्याचा निर्णय घेतला. मी दिल्लीहून दरभंगाला निघाले. पण वाटेतच वेदना सुरू झाल्या. गोरखपूर स्टेशनवर जीआरपीच्या मदतीने मला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझ्यासोबत कोणीही नव्हतं. सोमवारी सकाळी माझी सामान्य प्रसूती झाली, मी एका मुलाला जन्म दिला.
48 तासांनंतर बाळाला आईने पाजलं दूध
प्रसूती करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं, "आश्चर्य म्हणजे आईने डिलीव्हरीनंतर तिच्या मुलाला सोबत ठेवण्यास नकार दिला. आई तिच्या मुलाला स्तनपान करायलाही तयार नव्हती. कारण विचारलं असता, ती म्हणाली, माझा नवरा मला सोडून गेला, मी एकटी बाळाला कसे वाढवू? ती तिच्या पतीच्या दुष्कृत्यांची आठवण करून खूप रडायची. तिला इतकी राग आला होता की तिला मुलाला पाहण्याचीही इच्छा नव्हती. शेवटी इतर महिलांनी त्या बाळाला दूध पाजलं.
आई म्हणाली, "जेव्हा माझा नवरा मुलाची काळजी न घेता दुसऱ्या महिलेसोबत पळून गेला, तेव्हा मी त्याचा विश्वास का जपू? मी त्याच्यासाठी माझ्या आयुष्याचं बलिदान का देऊ? त्याने मला आई बनवले आणि मला सोडून दिलं. मला हे मूल माझ्यासोबत ठेवायचं नाही. त्याला जिथं हवं तिथं सोडा किंवा हवं तर कचऱ्यात फेकून द्या."
इतक्या पैशांचं केलंस काय? नवऱ्याने बायकोकडे हिशोब मागितला तर...; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल
आईचं बोलणं ऐकून रुग्णालय प्रशासन चिंतेत पडलं. ही बातमी सर्वत्र चर्चेचा विषय बनली. त्याच वेळी, मुलाला दत्तक घेण्यासाठी अनेक लोक रुग्णालयात येऊ लागले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुलाच्या आईचे दोन दिवस समुपदेशन केलं. जवळजवळ 48 तासांच्या प्रयत्नानंतर जेव्हा आईला समजलं की तिचं मूल खरोखरच तिच्यापासून हिरावून घेतलं जाणार आहे, तेव्हा तिने माफी मागितली. त्यानंतर तिने बाळाला ब्रेस्टफिड केलं.
आई म्हणाली, "माझा मुलगा जन्माला आला तेव्हा मला भीती वाटली की मी दुसऱ्यांच्या घरी जेवत आहे. मी त्याला कसं वाढवू? म्हणूनच मी त्याला माझ्यासोबत ठेवण्यास नकार दिला . मला माझ्या पतीच्या कृती आठवू लागल्या आणि रागाच्या भरात मी त्याला माझ्या जवळ येऊ दिलं नाही."
ही महिला दिल्लीत ज्या घरांमध्ये काम करत होती, त्यांनी तिला मदतीचा हात पुढे केला. त्यांनी मुलाला दिल्लीला आण आपण सर्वजण मिळून त्याचं संगोपन करू असं सांगितलं. महिला म्हणाली, तेव्हा मला जाणवलं की माझ्या मुलाचं किती नुकसान होत आहे. त्याला वडील नसतील तरी त्याला आई आहे. मी त्याला दिल्लीला घेऊन जाण्याचा आणि तिथे त्याला वाढवण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला.
आई सध्या तिच्या बाळासह जिल्हा महिला रुग्णालयात दाखल आहे. रुग्णालय प्रशासन आणि रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांचं कुटुंब तिला सर्वतोपरी मदत करत आहेत. आई आणि बाळाला मदत करण्यासाठी अनेक लोक तयार आहेत. बाळ सध्या निरीक्षणाखाली आहे. दोघांचीही प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल.
