TRENDING:

NASA ला मंगळावर असं काही सापडलं सगळेच हैराण, शास्त्रज्ञही पडले विचारात!

Last Updated:

मंगळावर एका छोट्या खडकावर हे खडे आढळल्याने संशोधक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.  

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था चंद्र, तसंच मंगळावरच्या वातावरणाबाबत सातत्याने सखोल संशोधन करत असतात. परग्रहांवरचं वातावरण आणि जमिनीत नेमके कोणते घटक आहेत, याचा अभ्यासदेखील केला जातो. मंगळावर संशोधन करत असताना संशोधकांना काही धक्कादायक आणि विचित्र गोष्टी दृष्टिक्षेपात आल्या आहेत. मंगळवर रोव्हरला अनेक चमकदार पांढरे खडे सापडले आहेत. मंगळावर एका छोट्या खडकावर हे खडे आढळल्याने संशोधक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.
News18
News18
advertisement

मंगळावरच्या खडकाळ जमिनीवरून चालताना नासाच्या पर्सीव्हरन्स रोव्हरला एक विचित्र दृश्य दिसले. मंगळावर या रोव्हरला अनेक चमकदार पांढरे खडे सापडले. हे खडे मंगळावरच्या जेझिरो क्रेटरच्या काठावर असलेल्या लहान खडकांमध्ये आहेत. रोव्हरने या खड्यांचे फोटो काढून नासाला पाठवले आहेत. हे फोटो पाहून संशोधकांचा उत्साह वाढला आहे. पर्सीव्हरन्स रोव्हर सध्या या क्रेटरच्या तीव्र उतारावर चढाई करत आहे.

advertisement

मिस्ट पार्क नावाच्या ढिगाऱ्याच्या तळाशी पर्सीव्हरन्स रोव्हरला हे खडे सापडले. आव्हानात्मक चढाईनंतर दोन महिन्यांनी त्याने हा शोध लावला. नासाच्या संशोधकांच्या पथकाने या खडकांचा आढावा घेण्यासाठी रोव्हरची रिमोट सेन्सिंग यंत्रणा सक्रिय केली आहे.

पृथ्वीवर अशा प्रकारचे पांढरे खडे सापडणं हे सामान्य गोष्ट आहे. असे खडकदेखील पृथ्वीवर अनेक ठिकाणी पाहायला मिळतात; पण मंगळावर पांढरे खडे सापडणं आश्चर्यकारक मानलं जातं. मंगळाच्या बेसाल्टिक थरामुळे हे आश्चर्य पाहायला मिळत आहे. याचा रंग सामान्यतः गडद असतो. या खडकांमधून मंगळाच्या भूवैज्ञानिक इतिहासाची माहिती समोर येऊ शकते.

advertisement

सध्या पर्सीव्हरन्सवरच्या मास्टकॅम-झेड या खडकांचं मल्टी स्पेक्ट्र्ल इमेजिंग करत आहे. सुपरकॅम लेझरच्या माध्यमातून या दगडांच्या आतली संरचना जाणून घेतली जात आहे. हे दगड आकाराने खूप लहान आणि विखुरलेले आहेत. त्यामुळे रोव्हरवर लावलेल्या रोबॉटिक आर्मवरची यंत्रणा त्याच्या जवळ जाऊन त्याचे बारकाईने निरीक्षण करू शकत नसल्याची स्थिती आहे. या नवीन संशोधनामुळे मंगळ ग्रहावरच्या अनेक रहस्यांची उकल होऊ शकते, असा विश्वास संशोधकांना आहे.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
NASA ला मंगळावर असं काही सापडलं सगळेच हैराण, शास्त्रज्ञही पडले विचारात!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल