TRENDING:

OMG! अन् पाहता पाहता अचानक 'गायब' झाला ऑक्टोपस; अद्भुत VIDEO VIRAL

Last Updated:

रंग बदलणाऱ्या ऑक्टोपसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : रंग बदलणारा प्राणी कोण विचारलं तर साहजिकच याचं उत्तर सरडा. सरडा रंग बदलतो हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे. पण ऑक्टोपसही सरड्याप्रमाणे रंग बदलतो हे तुम्हाला माहिती आहे का? सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या ऑक्टोपसचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अद्भुत असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.
फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब
फोटो - इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब
advertisement

ऑक्टोपसचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण सध्या जो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, तो तुम्ही कदाचित पहिल्यांदाच पाहत असाल. व्हिडीओ पाहूनच तुम्ही हैराण व्हाल. जसा सरडा ज्या गोष्टीवर जातो त्या गोष्टीचा रंग घेतो तसाच ऑक्टोपसही जिथं जाईल त्या रंगाचा होता. @octonation इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

advertisement

जगातील सर्वात विचित्र जीव; त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल 200 डोळे, दुर्बिणीसारखं करतात काम

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ऑक्टोपर सौम्य हिरव्या रंगाचा दिसतो आहे. तो एका पिवळ्या खडकावर जाऊन बसतो आणि हळूहळू त्याचा रंग बदलू लागतो. अगदी खडकाप्रमाणे त्याचा रंग बदलताना दिसतो. त्यानंतर तो तिथून उठताच पुन्हा होत्या त्या रंगात येतो. पुढे जाऊन तो दुसऱ्या खडकावर बसतो आणि त्याचा रंग घेतो. रंग बदलत बदलत तो खडकाच्या आत जातो. तो स्वतःला इतकं बदलतो की खडक आणि ऑक्टोपसमध्ये फरकच दिसत नाही.

advertisement

जर ऑक्टोपसची हालचाल झाली नाही तर तो त्या खडकाचाच भाग वाटेल. तिथं ऑक्टोपस आहे असं कुणी म्हणणारच नाही.

बापरे बाप! समुद्रात हे काय सापडलं, आजवर कधीच पाहिलं नाही; शास्त्रज्ञही थक्क

रंग बदलणारा ऑक्टोपस पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटतं आहे. ऑक्टोपससुद्धा रंग बदलतो यावर कुणाचाच विश्वास बसत नाही आहे. व्हिडीओ प्रत्यक्षात पाहून आपल्या डोळ्यांवरही विश्वास बसत नाही आहे. बहुतेकांना हे स्वप्न वाटतं आहे.

advertisement

तुम्ही कधी असा रंग बदलणारा ऑक्टोपस पाहिला होता का? हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.

मराठी बातम्या/Viral/
OMG! अन् पाहता पाहता अचानक 'गायब' झाला ऑक्टोपस; अद्भुत VIDEO VIRAL
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल