जगातील सर्वात विचित्र जीव; त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल 200 डोळे, दुर्बिणीसारखं करतात काम
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
तुम्हाला हे जाणून देखील आश्चर्य वाटेल, की स्कॅलपचे डोळे खराब झाल्यास सुमारे 40 दिवसात त्याचे डोळे पुन्हा निर्माण होऊ शकतात.
मुंबई 26 नोव्हेंबर : स्कॅलप हा जगातील सर्वात विचित्र प्राणी आहे. यात अनेक वैशिष्टय़े आहेत, ज्यांच्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. याला एक किंवा दोन नाही तर 200 डोळे असतात, जे दुर्बिणीसारखे काम करतात. त्याची पोहण्याची पद्धत काही कमी आश्चर्यकारक नाही, ज्यामध्ये ते जेट प्रोपल्शन तंत्र वापरतात. आता या जीवाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
@gunsnrosesgirl3 नावाच्या युजरने 'X' (पूर्वीचं ट्विटर) वर स्कॅलप प्राण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओंपैकी एक स्कॅलपचे डोळे दाखवतो तर दुसरा व्हिडिओ त्याच्या पोहण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे. @gunsnrosesgirl3 ने या व्हिडिओंच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, की 'स्कॅलपला 200 डोळे आहेत जे दुर्बिणीसारखे काम करतात.'
Scallops possess 200 eyes functioning like telescopes, utilizing living mine to focus light,
A concave mirror lining the back of their eyes reflects light onto a double-layered retina residing above it.
Janet Meltonpic.twitter.com/Tok9owyEXc
— Science girl (@gunsnrosesgirl3) November 24, 2023
advertisement
xcorr.net च्या अहवालानुसार, स्कॅलपचे डोळे अतिशय अद्वितीय असतात, ते लहान आणि सुमारे 1 मिलीमीटर रुंद असतात. हे डोळे स्कॅलपच्या आवरणाच्या बाजूला असतात, जे मानवी डोळ्यांसह बहुतेक प्राण्यांच्या डोळ्यांपेक्षा बरेच वेगळे आहेत. यामध्ये प्रकाशावर लक्ष केंद्रित करण्यासाठी लेन्सऐवजी Concave Mirrors आहेत. त्याचे डोळे परावर्तित दुर्बिणीसारखे असतात. प्रत्येक डोळ्यात दोन रेटिना असतात. तुम्हाला हे जाणून देखील आश्चर्य वाटेल, की स्कॅलपचे डोळे खराब झाल्यास सुमारे 40 दिवसात त्याचे डोळे पुन्हा निर्माण होऊ शकतात.
advertisement
स्कॅलप जसजसा वाढतो तसतसे डोळे कमी असलेल्या ठिकाणीही नवीन डोळे वाढतात. त्यांनी असंही सांगितलं की, 'स्कॅलप पोहण्यासाठी जेट प्रोपल्शन वापरतात.' विकिपीडियानुसार, या मॅकेनिज्म अंतर्गत ते पाणी आत घेण्यासाठी त्यांचे वाल्व उघडतात आणि बंद करतात आणि नंतर वेगाने पाणी सोडण्यासाठी ते पुन्हा बंद करतात. या तंत्राला पल्स्ड जेट प्रोपल्शन म्हणतात, जे हाय थ्रस्ट तयार करतं, ज्यामुळे हा जीव पुढे जाण्यास सक्षम होतो. स्कॅलप हा एक प्रकारचा मोलस्क आहे. ते जगातील सर्व महासागरांमध्ये आढळतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 26, 2023 7:34 AM IST
मराठी बातम्या/Viral/
जगातील सर्वात विचित्र जीव; त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल 200 डोळे, दुर्बिणीसारखं करतात काम