OTT Best Family Drama: ना बोल्ड सीन्स, ना अश्लील कंटेन्ट, कुटुंबासोबत पाहा हे 5 बेस्ट फॅमिली ड्रामा

Last Updated:

OTT Best Family Drama:ओटीटीवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या कथा पाहायला मिळतात. मात्र, अनेकदा मालिकांमध्ये अश्लीलता, हिंसाचार किंवा प्रौढ विषय असतात, ज्यामुळे त्या कुटुंबासह पाहता येत नाहीत.

5 बेस्ट फॅमिली ड्रामा
5 बेस्ट फॅमिली ड्रामा
OTT Best Family Drama: ओटीटीवर प्रेक्षकांना वेगवेगळ्या कथा पाहायला मिळतात. मात्र, अनेकदा मालिकांमध्ये अश्लीलता, हिंसाचार किंवा प्रौढ विषय असतात, ज्यामुळे त्या कुटुंबासह पाहता येत नाहीत. पण, सोनी लिव्हवर अशा काही मालिका आहेत ज्या तुम्ही निर्धास्तपणे मुलं आणि कुटुंबासह पाहू शकता. त्यांच्या कथांमध्ये साधेपणा आहे, विनोद आहे आणि नातेसंबंधांची खरी ऊब आहे.
'गुल्लक'
सर्वात आधी नाव घ्यावं लागेल 'गुल्लक'चं. मध्यमवर्गीय मिश्रा कुटुंबाभोवती फिरणारी ही मालिका प्रेक्षकांना स्वतःच्या घराची आठवण करून देते. छोट्या छोट्या भांडणं, इच्छा आणि स्वप्नांमधलं हे हास्य-भावनेचं पॅकेज IMDb वर तब्बल 9.1 रेटिंगसह अव्वल आहे.
‘निर्मल पाठक की घर वापसी’
त्यानंतर आहे ‘निर्मल पाठक की घर वापसी’. ही सीरीज ग्रामीण भागातील सामाजिक समस्या हलक्याफुलक्या पद्धतीने दाखवते. वैभव तत्ववादीने साकारलेला निर्मल पाठक आपल्या गावाशी आणि परंपरेशी पुन्हा जोडला जातो. जातीयता, शिक्षण, कुटुंबाची ओढ या सगळ्यावर ही सीरीज साधेपणाने प्रकाश टाकते.
advertisement
‘बडा नाम करेंगे’
‘बडा नाम करेंगे’ ही सूरज बडजात्यांची सीरीज म्हणजे कौटुंबिक मूल्यांचा उत्सवच. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ऋषभ आणि सुरभीची प्रेमकथा एवढी गोड आहे की प्रेक्षकांच्या मनात कायमची बसते. यात जमील खान आणि कंवलजीत सिंगसारख्या दमदार कलाकारांनी अभिनयाची झळाळी दिली आहे.
‘फॅमिली आज कल’
विनोद आणि हसवणूक हवी असेल तर ‘फॅमिली आज कल’ ही परफेक्ट मालिका आहे. लहानसहान गोष्टींमध्ये दडलेलं कुटुंबाचं प्रेम आणि नात्यांची खोली ही मालिका प्रेक्षकांना आपलीच गोष्ट वाटायला लावते.
advertisement
‘रात जवान है’
शेवटी, तरुण पालकांच्या संघर्षाची कथा सांगते ‘रात जवान है’. बरुण सोबती, प्रिया बापट आणि अंजली आनंद यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडतात. पालकत्व, मैत्री आणि करिअर यामध्ये संतुलन कसं साधायचं, हे मालिकेत अगदी हृदयस्पर्शी पद्धतीने दाखवलं आहे.
दरम्यान, या पाचही मालिका सोनी लिव्हवर सहज उपलब्ध आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यात अश्लीलता, गडबड किंवा हिंसा नाही. त्यामुळे हसत-खेळत संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहण्यासाठी या मालिका अगदी परफेक्ट आहेत.
मराठी बातम्या/मनोरंजन/
OTT Best Family Drama: ना बोल्ड सीन्स, ना अश्लील कंटेन्ट, कुटुंबासोबत पाहा हे 5 बेस्ट फॅमिली ड्रामा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement