आज दत्तगुरुची कृपा! या 5 राशींचे नशीब बदलणार, मोठ्या संधींसह हाती बक्कळ पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : 11 सप्टेंबरचा दिवस विशेष मानला जात आहे. हा दिवस दत्तगुरुंना समर्पित असल्यामुळे भक्तांसाठी धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.
मुंबई : 11 सप्टेंबरचा दिवस विशेष मानला जात आहे. हा दिवस दत्तगुरुंना समर्पित असल्यामुळे भक्तांसाठी धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे. याशिवाय राहू ग्रहाच्या संक्रमणामुळे काही राशींवर शुभ परिणाम होणार असून, काही राशींना महत्त्वपूर्ण संधी मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊया उद्याचा दिवस कोणत्या राशींसाठी भाग्यवर्धक ठरणार आहे.
मेष राशी
मेष राशीच्या व्यक्तींना उद्या आत्मविश्वासाची नवी ऊर्जा लाभेल. तुमच्या कार्यक्षमतेला योग्य दिशा मिळेल आणि मनाप्रमाणे काम पूर्ण करता येईल. आर्थिक बाबतीत चांगले दिवस येणार असून, उत्पन्नाचे नवे मार्ग खुलतील. आरोग्य उत्तम राहील आणि वैयक्तिक जीवनात आनंदी क्षण अनुभवता येतील. लव्ह लाईफमध्येही समाधान व स्थैर्य मिळेल.
सिंह राशी
सिंह राशीसाठी उद्या नशिबाचा उत्तम सहवास मिळेल. पूर्वीपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायिक किंवा करिअरच्या क्षेत्रात नवे करार व डील मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व तुमची मते घरात मान्य केली जातील. हा दिवस तुमच्या इच्छापूर्तीसाठी अनुकूल आहे.
advertisement
तूळ राशी
तूळ राशीसाठी उद्याचा दिवस जबाबदाऱ्या व यशाचा संगम घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी दिली जाईल, जी तुम्ही प्रामाणिकपणे निभावाल. मेहनतीला चांगला प्रतिसाद मिळेल. मात्र पैशांच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यवहारात योग्य शहानिशा करूनच निर्णय घ्या. आरोग्य स्थिर राहील, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांसाठी उद्या अत्यंत शुभ दिन असेल. आर्थिक वृद्धी होईल आणि समाजात तुमचे मान-सन्मान वाढतील. प्रतिष्ठीत लोकांशी नवे संबंध प्रस्थापित होतील. गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ मिळेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. समाजात तुमचे नाव उज्ज्वल होईल आणि नवीन संधी हाताशी येतील.
advertisement
मीन राशी
मीन राशीसाठी उद्याचा दिवस समृद्धी आणि प्रगती घेऊन येणारा असेल. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे. कामाचा विस्तार वाढेल, बॅंक बॅलन्स सुधारेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक वा अध्यात्मिक कार्यात व्यतीत होईल. मात्र कोणताही निर्णय घाईगडबडीत घेणे टाळा.
(सदर बातमी फक्त माहिती करिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 6:39 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
आज दत्तगुरुची कृपा! या 5 राशींचे नशीब बदलणार, मोठ्या संधींसह हाती बक्कळ पैसा येणार