सोमवारी एका सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षिकेच्या या वर्तनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आदिवासी शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त नरोत्तम वरकाडे यांनी सांगितले की, संबंधित शिक्षिकेला निलंबित करण्यात आले असून पुढील कारवाईसाठी या प्रकरणाची विभागीय चौकशी केली जाईल.
ही शाळा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या मनवर विकासखंडातील सिंघाणा गावात आहे. वरकाडे म्हणाले की, मनवर ब्लॉकमध्ये एकात्मिक शाळा संकुल आहे, जिथे 23 जून रोजी ही शिक्षिका नशेत आली आणि तिने तेथे काम करणाऱ्या कामगारांशी व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले.
हे ही वाचा : बॉस नाही, कामाचं टेन्शन नाही, फक्त लाईट चालू-बंद करा अन् 30 कोटी कमवा! वाचा या नोकरीचं वास्तव!
हे ही वाचा : पैशासाठी वाट्टेल ते! रेकाॅर्ड व्हिडीओ ₹500, लाईव्ह व्हिडीओसाठी ₹2000... स्वीट कपलचा 'धंदा' पाहून चक्रावले पोलीस
