लग्नाबाबत सखोल चौकशी केली नाही, तर अनेकवेळा अशा प्रकारे फसवणूक होते की, या धक्क्यातून बाहेर पडता येत नाही. शेजारील चीनमधील एका व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले आहे. त्याने त्याच्या लग्नाचा पोशाख शिवून घेतला. पण वधू कुठेच दिसेना. नंतर कळले की, त्याची फसवणूक झाली आहे.
हे ही वाचा : फक्त 9800 रुपयांना आलिशान कार! जाहिरात होतीय चांगलीच व्हायरल, किंमत ऐकून नेटकरी चकीत
advertisement
साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण चीनच्या हुबेई प्रांतातील आहे. येथे राहणाऱ्या शिन नावाच्या मुलाची शाओयू नावाच्या मुलीशी भेट झाली. ऑनलाइन भेटल्यानंतर दोघांनीही या नात्याला मान्यता दिली. मुलीने शिनकडे वधूचे पैसे म्हणून 22 लाख रुपये मागितले, ही चिनी प्रथा आहे. यानंतर तिने शिनकडे तिच्या बहिणीसाठी आणि तिच्या आईच्या शस्त्रक्रियेसाठी भेटवस्तूंसाठी पैसे मागितले. त्याने दिले, भेटायला बोलावले तेव्हा ती भेट टाळू लागली. जेव्हा शिनला संशय आला तेव्हा मुलीने त्याला तिचे काही फोटो पाठवले आणि त्याच्याशी फोनवर बोलली. शिनच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षभरात त्याने एकूण 55 लाखांहून अधिक रुपये मुलीला ट्रान्सफर केले होते.
शेवटी, शिनचे कुटुंब आणि शाओयूचे कुटुंब भेटण्यास तयार झाले. येथे भेटलेली मुलगी फोटोपेक्षा वेगळी दिसत होती, ज्यावर त्याने फिल्टर वापरल्याचे स्पष्ट केले. दोघांचे लग्न ठरले आणि शिनने त्यांना आणखी काही पैसे दिले. दरम्यान, शिनला तरुणीच्या फोनमध्ये संशयास्पद मेसेज दिसले आणि तिला तिच्याशी बोलायचे होते, तेव्हा तिने फोन हॅक झाल्याचे निमित्त केले.
हे ही वाचा : काजू-बदामांची दुकानं बंद करेल हे विदेशी फळ, तुम्हाला माहितीय का त्याचे फायदे?
जेव्हा शाओयूच्या कथित बहिणीने शिनशी ब्रेकअप झाल्यानंतर बोलली तेव्हा संपूर्ण रहस्य उघड झाले. तपासाअंती शिनला समजले की, ज्या मुलीने शाओयूची बहीण असल्याचे भासवले तीच मुलगी त्याची फसवणूक करून त्याच्याकडून पैसे उकळत होती. घाबरलेल्या शिनने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली असता, फसवणूक करणारी महिला विवाहित असून तिला एक मूल आहे, तिच्यासाठी ती अशा प्रकारे पैसे कमवत असल्याचे उघड झाले.