आंध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यातील कावली येथील 25 वर्षांचा देवेंदुला राजू आणि 18 वर्षांची संजना मांजा एकमेकांना भेटल्यानंतर काही दिवसांतच हे जोडपं प्रेमात पडलं. नंतर हे कपल ओयो रूममध्ये जाऊ लागले. जे त्यांना खुलआम करता येत नव्हतं ते इथं जाऊन करत होते. यासाठी ते नेहमी ओयो रूममध्ये जायचेय. जे करायला बंदी होती तेच ते करत होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. शुक्रवारी रात्री एसटीएफच्या पथकाने पाहणी करून छापा टाकला. दोघांनाही पोलिसांनी अटक केली, त्यांची चौकशी सुरू केली आहे.
advertisement
ओयो हॉटेलला न जाता आयुष्य उद्ध्वस्त! सोशल मीडियावर फोटो टाकताना जपूनच रहा
या कपलने भेटल्यानंतर पैसे कमवण्याचा प्लॅन बनवला. भरपूर पैसे कमावण्याच्या आणि ऐशोरामी जीवन जगण्याच्या प्लॅनने गांजाचा व्यवसाय सुरू केला आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी चोरांची ही जोडी ओयोच्या खोलीत राहायची. ओयो रूम भाड्याने घेऊन गांजा विकायला सुरुवात केली. दोघंही कोंडापूर येथील ओयो रूममध्ये राहून अनेक दिवसांपासून गांजाचा व्यवसाय करत होते. हे दोघंही वेगवेगळ्या ठिकाणाहून गांजा आणायचे आणि ओयोच्या खोलीतून गांजा विकायचे, असे सांगण्यात येतं.
