व्हेरी वेल हेल्थ या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार उत्तर पाकिस्तानमध्ये एक हुंजा खोरं आहे, जिथं हुंजा जमातीचे लोक राहतात. हे लोक त्यांच्या उच्च आयुर्मानासाठी ओळखले जातात. हुंजा जमातीचे लोक खूप दीर्घ आयुष्य जगतात. इथं 100 वर्षांपर्यंत जगणं खूप सामान्य आहे. आज हुंझाच्या 6 जमाती पारंपारिक तसंच आधुनिक जीवन जगत आहेत. 1980 आणि 1990 च्या दशकात अमेरिकन आणि युरोपीय प्रवासी इथं वारंवार भेट देत असत.
advertisement
War Siren : युद्धाइतकाच खतरनाक युद्धाचा एअर रेड सायरन, कानात आवाज जाताच होतो मृत्यू
इतकी वर्षे कसं जगतात लोक?
हुंजा जमातीचे लोक 100-120 वर्षे आरामात राहतात, या दाव्यावर अनेक वेळा संशोधन झालं आहे. 1970 च्या दशकात नॅशनल जिओग्राफिकनेही संशोधन केलं. दीर्घायुष्याचं रहस्य काय आहे हे शास्त्रज्ञांनाही पूर्णपणे माहित नाही. 1986 मध्ये अहमद नावाच्या एका संशोधकाने म्हटलं होतं की येथील हवामान, हिमनदीचं पाणी, इथं आढळणारं जर्दाळू फळ इत्यादी कारणं असू शकतात. त्यांनी सांगितलं होतं की येथील पाण्यात असे अनेक खनिजे आहेत, जे लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य आहेत. पण एक गोष्ट जी लोकांना दीर्घकाळ जिवंत ठेवते ती म्हणजे इथल्या लोकांचं एकमेकांप्रती असलेलं सामाजिक वर्तन.
बहुतेक लोक शाकाहारी जेवण खातात
हुंजा लोक कोणत्याही आजाराने ग्रस्त नाहीत कारण हे लोक खूप मेहनती आहेत. ते डोंगराळ भागात राहतात, त्यामुळे त्यांना डोंगर चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यांना लांब अंतर चालावं लागतं. पर्वत खूप खडकाळ आहेत, गावं 1000 वर्षे जुनी आहेत जी कधी उतारावर तर कधी चढाईवर बांधलेली असतात, त्यामुळे त्यांना खूप व्यायाम मिळतो.
असं मानलं जातं की हुंझा लोक त्यांच्या शेतात जे पिकवतात ते जास्त खातात आणि मांस कमी खातात. तथापि ते हिवाळ्यासाठी मांस साठवतात. हे लोक शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहतात आणि त्यांच्यात लठ्ठपणाचे प्रमाण खूप कमी असतं. बहुतेक लोक सिगारेट ओढत नाहीत, संशोधनात फक्त 47 लोक धूम्रपान करणारे आढळलं.
Burj Khaifa : बुर्ज खलिफावर ही लांब दांडी का लावली आहे, याचं रहस्य काय?
तरी असं नाही की हे लोक पूर्णपणे निरोगी आहेत. 2021 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, 5 हुनझा गावांमधील 425 लोकांवर उच्च रक्तदाबावर संशोधन करण्यात आलं. ज्यामध्ये असं दिसून आलं की तीनपैकी एका व्यक्तीला उच्च रक्तदाबाची समस्या होती आणि त्याला मधुमेहदेखील होता.
