TRENDING:

आईबाबा झोपले होते, 5 वर्षांच्या चिमुकल्याने केला भलताच कांड, अख्खं कुटुंबं धक्क्यात

Last Updated:

Boy online shopping from parents mobile : आईवडील झोपले असताना असं काही केलं की तुम्ही विचारही केला नसाल. चिमुकल्याने असा कांड केला की सगळ्यांची झोप उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
वॉशिंग्टन : लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. असाच एक अवघ्या 5 वर्षांचा मुलगा ज्याने त्याचे आईवडील झोपले असताना असं काही केलं की तुम्ही विचारही केला नसाल. चिमुकल्याने असा कांड केला की सगळ्यांची झोप उडाली आहे. संपूर्ण कुटुंब धक्क्यात आहे. अमेरिकेतील हे धक्कादायक प्रकरण आहे. ज्याबाबत मुलाच्या पालकांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
प्रतीकात्मक फोटो (AI Generated)
advertisement

आजच्या डिजिटल युगात मुलांच्या हातात स्मार्टफोन असणे हे सामान्य झालं आहे, पण पालकांनी नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे. पालकांनी शक्य तितक्या कमी वेळा त्यांच्या मुलांना फोन द्यावा, कारण कधीकधी त्यांना त्याचं व्यसन लागतं. तसंच याव्यतिरिक्त मुलं फोनवर असं काहीतरी करू शकतात जे त्यांना हानी पोहोचवू शकतं. असंच काहीसं या कुटुंबात घडलं.

advertisement

तुम्हाला विश्वास बसणार नाही अमेरिकेत एका 5 वर्षांच्या मुलाने त्यांच्या पालकांच्या फोनमधून पैसेच गायब केले आहेत.या मुलाने त्याच्या पालकांचा फोन घेऊन त्यावरून ऑनलाईन शॉपिंग केली आहे. त्याने फोनचा वापर करून Amazon वर सुमारे 3 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची खरेदी केली आणि पालकांना त्याची कल्पनाही नव्हती.

OMG! गर्भातील बाळाने आपल्याच भावंडांना 'खाल्लं', सोनोग्राफी रिपोर्ट पाहून डॉक्टरही धक्क्यात

advertisement

न्यू यॉर्क पोस्टनुसार, मुलाच्या आईने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे ही धक्कादायक घटना उघडकीस आली. व्हिडिओमध्ये, वडील आपल्या लहान मुलाला विचारतात, "तू अमेझॉनवरून सात कार ऑर्डर केल्या? तू 3,000 डॉलर्स खर्च केलेस? तू हे सर्व कसं केलं?"

मुलगा त्याच्या भावंडांमध्ये शांतपणे बसला होता, जणू काही काहीही झालंच नाही. व्हिडिओमध्ये नंतर अमेझॉन ऑर्डरची यादी दाखवली जाते ज्यामध्ये खेळण्यांच्या कार, व्हिडिओ गेमच्या वस्तू आणि मुलांच्या आवडत्या भेटवस्तूंचा समावेश आहे, जणू कोणीतरी सांताक्लॉजला संपूर्ण यादी पाठवली आहे.

advertisement

ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गेली तरुणी, तिथंच बनवली रील, नको तेच दाखवलं, लाखो लोकांनी पाहिला VIDEO

मुलाच्या आईने व्हिडिओ कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "त्याने कार्टमध्ये $700 किमतीचं आणखी प्रोडक्ट्स ठेवली होती जी आम्हाला वेळेत दिसली. मी आणि माझा नवरा दोघांवरही रडण्याची वेळ आली. मी Amazon तर माझा नवरा बँकेशी बोलत आहे.

व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि कमेंट्स मिळाल्या आहेत, ज्यामध्ये बऱ्याच लोकांनी त्यांच्या स्वतःच्या स्टोरीही सांगितल्या आहेत. तुमच्या किंवा तुमच्या ओळखीतील मुलाने असा पराक्रम केला होता का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
आईबाबा झोपले होते, 5 वर्षांच्या चिमुकल्याने केला भलताच कांड, अख्खं कुटुंबं धक्क्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल