TRENDING:

ऑनलाईन बुक केली ऑटो रिक्षा, पण आली Mercedes; कसं काय? प्रवाशीही आश्चर्यचकीत

Last Updated:

Online Ride Booking : तुम्ही ऑटो रिक्षा बुक केली आणि त्याऐवजी मर्सिडीज आली तर... एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय ना. पण काही प्रवाशांच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बंगळुरू : बरेच लोक आता प्रवासासाठी ऑनलाईन गाडी बुक करतात. ऑनलाइन अॅपवर बाईक, रिक्षा किंवा कॅब बुक केली जाते. फोर व्हिलर मागवली की एक साधीशी कार येते. पण तुम्ही ऑनलाईन बुकिंगमध्ये कधी मर्सिडीजसारखी गाडी आल्याचं पाहिलं आहे का? आश्चर्य म्हणजे तुम्ही ऑटो रिक्षा बुक केली आणि त्याऐवजी मर्सिडीज आली तर... एखाद्या स्वप्नासारखं वाटतंय ना. पण काही प्रवाशांच्या बाबतीत हे प्रत्यक्षात घडलं आहे.
News18
News18
advertisement

मर्सिडीजमध्ये फिरावं असं स्वप्न कित्येकांचं असतं. पण लाखो रुपयांची ही गाडी प्रत्येकाला घेणं शक्य नाही. साधी कारही कित्येकांना परवडणारी नाही. असे लोक किमान ऑनलाईन कार बुकिंग करून तरी असा प्रवासाचा आनंद घेतात. पण साधी कार नाही तर मर्सिडीज तुम्हाला घ्यायला आली तर... हे कसं शक्य आहे? असाच आश्चर्यकारक धक्का बसला तो काही प्रवाशांना. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

advertisement

Hotel : असंही एक हॉटेल, जिथं आत जाताच काढावे लागतात कपडे, घातल्यास दंड; कोणतं, आहे कुठे?

एक साधी कार किंवा ऑटो रिक्षा बुक केलेल्या प्रवाशांना घेण्यासाठी चक्क मर्सिडीज बेन्ज आली. त्यामुळे प्रवासीही थक्क झाले. आपण बुक केली वेगळीच गाडी आणि त्याऐवजी मर्सिडीज बेन्ज कशी काय आली असा प्रश्न या प्रवाशांनाही पडला. त्यांनी ड्रायव्हरला याबाबत विचारलं. तेव्हा त्यांना जे उत्तर मिळालं तेसुद्धा सरप्राइझिंग आहे.

advertisement

ऑनलाईन गाड्यांची सेवा पुरवणाऱ्या या कंपनीकडून प्रवाशांना हे सरप्राइझ देण्यात आलं आहे. लकी प्रवाशांना सरप्राईझ गिफ्ट म्हणून नेहमीच्या कॅबऐवजी मर्सिडीज बेन्ज राइड्सची संधी देण्यात आली आहे. ज्यामध्ये मारुती सुझुकी वॅगन आरचा समावेश होता.

रहस्यमयी ट्रेन! स्टेशन सोडताच 'गायब' होते, तब्बल 6 दिवसांनी दिसते; कोणती, कुठून सुटते?

आता हे सरप्राइझ नक्की कुठे मिळतेय हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. तर नम्मा यात्रीने दिलेलं हे सरप्राईझ.  नम्मा यात्री हे नोव्हेंबर 2022 मध्ये प्रवाशांसाठी ऑनलाइन वाहन राइड बुक करण्यासाठी लाँच केलेले राइड-हेलिंग अॅप्लिकेशन आहे. अलीकडेच कंपनीने त्यांच्या बंगळुरूमधील ग्राहकांसाठी एक विशेष व्यवस्था सुरू केली आहे, ज्यामध्ये त्यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून मर्सिडीज-बेंझमध्ये राइड्स देण्याची ऑफर देण्यात आली आहे.

advertisement

नम्मा यात्रीने मर्सिडीज पिक-अप ठिकाणी आल्यावर आणि सुरुवातीलाच 50 लाख रुपये किमत असलेल्या या कारमध्ये बसण्याची संधी मिळाल्यावर प्रवाशांच्या प्रतिक्रिया टिपणारा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. नम्मा यात्री सेंट मर्सिडीज गाडी चालवणारा ड्रायव्हर ग्राहकांना नियमित कॅबऐवजी मर्सिडीजमध्ये बसल्याबद्दल धक्का बसल्यानंतर 'आप लकी हो' असे म्हणत असल्याचं दिसत आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावरची दहशत कमी होणार, पुण्यात भटक्या कुत्र्यांसाठी प्लॅन ठरला...
सर्व पहा

@bangalore_social इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 'भाऊ, वॅगन आरची अपेक्षा होती, बेंझ मिळाली', असं मजेशीर कॅप्शन लिहिलं आहे. तर कमेंटमध्येही यावर बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे. पुढच्या वेळी फरारी अशी कमेंट युझर्स करत आहेत.

मराठी बातम्या/Viral/
ऑनलाईन बुक केली ऑटो रिक्षा, पण आली Mercedes; कसं काय? प्रवाशीही आश्चर्यचकीत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल