TRENDING:

Viral News : या जमातीचे लोक अंघोळ करत नाहीत, कारण जाणून लावाल डोक्याला हात

Last Updated:

जगभरात वेगवेगळ्या जमातीचे लोक राहतात. असेही लोक जगात आहेत ज्यांच्या राहणीमान, जीवनशैलीविषयी अनेकांना माहित नाही. अनेक जमातीमध्ये वेगवेगळ्या, विचित्र गोष्टी केल्या जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : जगभरात वेगवेगळ्या जमातीचे लोक राहतात. असेही लोक जगात आहेत ज्यांच्या राहणीमान, जीवनशैलीविषयी अनेकांना माहित नाही. अनेक जमातीमध्ये वेगवेगळ्या, विचित्र गोष्टी केल्या जातात. काही तर गेल्या अनेक वर्षांपासून अशा परंपरा पाळत आले आहेत. अशीच एक जमात आहे ज्याठिकाणी अंघोळीला बंदी आहे. हे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल मात्र ही गोष्ट खरी आहे. ही जमात कोणती आहे आणि याठिकाणची जीवशैली कशी आहे याविषयी जाणून घेऊया.
या जमातीचे लोक अंघोळ करत नाहीत
या जमातीचे लोक अंघोळ करत नाहीत
advertisement

आजच्या काळातही काही जमाती जुन्या काळापासूनचे नियम पाळतात. अशीच एक जमात आहे तिचं नाव आहे हिंबा. या जमातीचे 50,000 लोक असून या जमातीत अंघोळ करण्यास सक्त मनाई आहे. नामिबियामध्ये ही जमात असून येथे येणाऱ्या पर्यटकांची सेवा महिला करतात.

हिंबा जमातीच्या लोकांचे स्वतःचे नियम आणि कायदे आहेत. या जमातीचे लोक अन्नाच्या शोधात दिवसभर घालवतात. मित्रांना त्यांची घरे बांधण्यात मदत करतात. शिवाय त्याचा वेळ शेतीतही जातो. पाण्याने आंघोळ करण्याऐवजी हे लोक धुराने आंघोळ करतात. याला स्मोक बाथिंग म्हणतात.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात वाढ, तूर भाव घसरले, कापसाची काय स्थिती? Video
सर्व पहा

या जमातीची एक विचित्र परंपरा आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना चहा, नाष्टा आणि जेवण दिले जाते, त्याचप्रमाणे या जमातीचे लोक आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांची सेवा घरातील महिलांकडून करुन घेतात. त्यासाठी त्यांच्या घरात स्वतंत्र खोली बनवलेली असते. या कामासाठी महिलेचा पती स्वतः पत्नीला त्यांच्याकडे पाठवतो. तुमच्या नात्यातील मत्सराची भावना दूर करण्यासाठी हे केले जाते. हे लोक मुख्यतः शेती आणि पशुपालन करतात. महिलांना जमातीत काहीही बोलता येत नाही आणि सर्व निर्णय घरातील पुरुष घेतात.

advertisement

मराठी बातम्या/Viral/
Viral News : या जमातीचे लोक अंघोळ करत नाहीत, कारण जाणून लावाल डोक्याला हात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल